देहरादून, 07 जानेवारी: दोन दिवसांपूर्वी पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi Security) यांच्या सुरक्षितेत मोठी चूक झाली होती. ऐनवेळी शेतकऱ्यांनी पंजाब दौऱ्यावर असणाऱ्या पीएम मोदी यांचा ताफा आडवला होता. याचे तीव्र पडसाद देशभरात उमटले होते. या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्रालयाकडून देण्यात आले आहेत. हे प्रकरण ताजं असताना आता, उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत (Former CM Harish Rawat) यांच्या सुरक्षिततेच मोठी चूक आढळली आहे. मुख्यमंत्री रावत काशीपूर येथील एका सभेत असताना, एक व्यक्ती सुरा घेऊन थेट स्टेजवर पोहोचल्याची (young man reached at stage with knife) धक्कादायक घटना समोर आली आहे.
पण यावेळी स्टेजवर आणि आसपास उपस्थित असणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी वेळीच प्रसंगावधान दाखवल्याने मोठी जीवितहानी टळली आहे. खरंतर, माजी मुख्यमंत्री हरीश रावत एका कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. याठिकाणी जाहीर सभा संपल्यानंतर अचानक एक मध्यमवयीन व्यक्ती चाकू घेऊन स्टेजवर चढल्याने एकच गोंधळ उडाला. मात्र, काँग्रेस कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी संबंधित व्यक्तीला स्टेजवरून खाली उतरवून त्याच्याकडील चाकू आपल्या ताब्यात घेतला आहे. तसेच आरोपीला पोलिसांच्या हवाली केलं आहे.
हेही वाचा-गुंडाचं नाव वापरून मागितली लाखोंची खंडणी, Easy Money च्या नादात पोहोचले तुरुंगात
हल्ला करणाऱ्याने दिल्या 'जय श्री राम'च्या घोषणा
मिळालेल्या माहितीनुसार, माजी मुख्यमंत्री हरीश रावत प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेसच्या सदस्यत्व मोहिमेत सहभागी होण्यासाठी आले होते. यावेळी भाषण संपल्यानंतर रावत स्टेजवरील आपल्या खुर्चीवर जाऊन बसले. यावेळी अचानक एक मध्यमवयीन व्यक्ती स्टेजवर पोहोचला. स्टेजवर आल्यानंतर त्याने माईकवरून जय श्री रामच्या घोषणा दिल्या. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्याची अडवणूक करत माईक बंद केला. यावेळी संतापलेल्या आरोपीनं अचानक आपल्या जवळील सुरा काढला. तसेच जय श्री राम न बोलल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.
हेही वाचा-पंतप्रधान सुरक्षा प्रकरणात 27 निवृत्त IPS अधिकाऱ्यांचं राष्ट्रपतींना पत्र
यानंतर मंचावर एकच गोंधळ उडाला. दरम्यान काँग्रेस नेते प्रभात साहनी यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी संबंधित तरुणाला पकडून त्याच्याकडील सुरा ताब्यात घेतला. यानंतर कार्यकर्त्यांनी आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिलं. ही प्रशासनाची मोठी चूक असल्याचा आरोप काँग्रेसने केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.