Home /News /national /

PM Security Breach: पंतप्रधान सुरक्षा प्रकरणात 27 निवृत्त IPS अधिकाऱ्यांचं राष्ट्रपतींना पत्र

PM Security Breach: पंतप्रधान सुरक्षा प्रकरणात 27 निवृत्त IPS अधिकाऱ्यांचं राष्ट्रपतींना पत्र

पंतप्रधानांच्या सुऱक्षेत चूक होणे, हा अतिशय गंभीर मुद्दा असून त्याची गंभीर दखल घेतली जावी, असं पत्र 27 माजी आयपीएस अधिकाऱ्यांनी राष्ट्रपतींना लिहिलं आहे.

    नवी दिल्ली, 6 जानेवारी: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सुरक्षाव्यवस्थेत (Security) झालेली कसूर (Compromise) ही अक्षम्य बाब असून त्याची गंभीर दखल (Serious attention) घेण्याची मागणी 27 निवृत्त अधिकाऱ्यांनी (Retired IPS offcers) केली आहे. या अधिकाऱ्यांनी राष्ट्रपतींना पत्र (Letter to president) लिहून ही मागणी केली आहे. हे सर्व माजी IPS अधिकारी असून देशाच्या पंतप्रधानांच्या सुरक्षेत यापूर्वी इतकी गंभीर चूक कधीच झाली नव्हती, असं म्हटलं आहे.  काय आहे प्रकरण? पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाब दौऱ्यावर असताना भटिंडा विमानतळावरून फिरोजपूरला हेलिकॉप्टरने जाण्याऐवजी आयत्या वेळी रस्त्याने जाण्याचा निर्णय घेतला होता. या मार्गावर काही शेतकरी आंदोलन करत असल्यामुळ पंतप्रधानांच्या ताफ्याला साधारण 15 ते 20 मिनिटं वाट पाहत थांबावं लागलं होतं. त्यानंतर सुरक्षेतील त्रुटी लक्षात आल्यामुळं पंतप्रधानांना नियोजित कार्यक्रम रदद् करून दिल्लीला परत यावं लागलं होतं. या प्रकरणात पंजाब राज्य सरकारकडून पंतप्रधानांना सुरक्षा देण्यात कसूर झाल्याचा ठपका केंद्रीय गृहमंत्रालयानं ठेवला होता.  अधिकाऱ्यांचं राष्ट्रपतींना पत्र  राष्ट्रपतींना पत्र पाठवलेल्यांपैकी 27 जण माजी डीजीपी आहेत. देशाच्या पंतप्रधानांची सुरक्षा हा देशाच्या सन्मानाचा आणि सुरक्षेचा मुद्दा असतो. या प्रकार केवळ किरकोळ चूक म्हणून दुर्लक्ष करण्यासारखा नाही. या प्रकाराची गंभीर दखल घेण्यात यावी आणि राष्ट्रपतींनी या प्रकरणात स्वतः लक्ष घालावं, अशी मागणी या अधिकाऱ्यांनी केली आहे.  हे वाचा - देशभरातून टीका पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत झालेल्या हयगयीनंतर देशभरातून या प्रकारावर टीका होत आहे. भाजप आणि केंद्रीय गृहमंत्रालय यांनी बुधवारपासूनच पंजाब राज्य सरकारवर टीकास्त्र सोडायला सुरुवात केली होती. आता इतर समाजघटकांमधूनदेखील या घटनेबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून याबाबत गंभीर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Letter to president, Narendra modi, President, Prime minister, Security

    पुढील बातम्या