रांची, 6 जानेवारी: परिसरातील कुप्रसिद्ध गुंडाच्या (Criminal) नावाचा वापर करत व्यापाऱ्याकडे (Businessman) 5 लाख रुपयांची (Rs. 5 lakh) खंडणी (Ransom) मागणाऱ्या दोघांना पोलिसांनी बेड्या (Arrested) ठोकल्या आहेत. झटपट पैसे मिळवण्यासाठी त्यांनी व्यापाऱ्याला लुटण्याचा डाव आखला. त्यासाठी व्यापाऱ्याच्या नंबरवर फोन करून त्याच्याकडे 5 लाख रुपयांची खंडणी मागितली. मात्र व्यापाऱ्याने पोलिसांत धाव घेतल्यामुळे दोघांचा डाव फसला. अशी घडली घटना झारखंडमधील धनबाद परिसरात राहणाऱ्या सद्दाम अन्सारी आणि सुभान अन्सारी या दोघांना झटपट पैसे मिळवण्याची इच्छा होती. काहीही करून पैसे कमवावेत आणि ऐश करावी, अशी योजना आखत त्यांनी एका व्यापाऱ्याकडे खंडणी मागण्याचा डाव आखला. राजेश अग्रवाल नावाच्या व्यापाऱ्याकडे सद्दामने यापूर्वी लाईट फिटिंगचं काम केलं होतं. त्यामुळे अग्रवाल यांच्या आर्थिक परिस्थितीची त्याला कल्पना होती. त्याचा गैरफायदा घेत दोघांनी अग्रवाल यांना फोन केला आणि खंडणीची मागणी केली. वेगवेगळ्या नंबरवरून केले फोन सद्दाम आणि सुभान यांनी अग्रवाल यांना वेगवेगळ्या पाच नंबरवरून फोन केले आणि 5 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. अग्रवाल यांनी मागणी गांभिर्यानं घ्यावी आणि पैसे द्यावेत यासाठी त्यांनी गुंड अमन सिंह याच्या नावाने खंडणीची मागणी केली. मात्र अग्रवाल यांनी गुंडगिरीला थारा न देता थेट पोलीस ठाणं गाठलं आणि घडल्या प्रकाराची पोलिसांना कल्पना दिली. हे वाचा -
लोकेशनच्या आधारे अटक पोलिसांनी तक्रार मिळताच ज्या ज्या नंबरवरून फोन आले, त्यांचं लोकेशन शोधलं. शेवटचा फोन ज्या नंबरवरून आला, त्या लोकेशनला पोलीस पोहोचले आणि दोघांच्या मुस्क्या आवळल्या. दोघांनीही आपला गुन्हा कबूल केला असून जलद पैसे मिळवण्याच्या लालसेपायीच आपण हे कृत्य केल्याचं म्हटलं आहे. दोघांचं कुठलीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याची माहिती पोलिसांनी दिली असून या प्रकऱणी अधिक तपास सुरू आहे.