शहाजहांपूर, 09 जानेवारी: शाहजहांपूर जिल्ह्यातील टकेली गावात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील एक तरुणाने आपल्या पत्नीच्या मृतदेहासोबत स्वत:ला 24 तास घरात कोंडून घेतलं होतं. गावकऱ्यांनी अनेक हाका मारूनही त्यानं घराचा दरवाजा उघडला नाही. शेवटी संशय आल्याने गावकऱ्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, घराचा दरवाजा तोडला. आतील दृश्य पाहून पोलिसांना धक्काच बसला आहे. पोलिसांनी संबंधित तरुणाला ताब्यात घेतलं असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. मुकेश कुमार असं संबंधित तरुणाचं नाव आहे. त्याने 25 वर्षीय पत्नी नीरज देवी यांच्या मृतदेहासोबत स्वत:ला कोंडून ठेवलं होतं. पण पोलिसांनी दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला असता खोलीत बेडवर पतीचा मृतदेह आढळून आला आहे. पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने धक्कादायक खुलासा केला आहे. संबंधित घटना उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर येथील आहे. हेही वाचा- अपमानाचा घेतला भयंकर बदला; खिंडीत गाठून मालकाचा खेळ खल्लास, दरीत फेकला मृतदेह पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकेश हा रुद्रपूर येथील एका कारखान्यात काम करतो. याठिकाणी त्याच्या गावातील दोन तरुणांसोबत गोला आणि रुद्रपूर या शेजारील गावातील प्रत्येकी एक तरुणही काम करतात. घटनेच्या दिवशी शुक्रवारी दुपारी हे चारही तरुण मुकेशच्या घरी आले होते. घरी आल्यानंतर चारही जणांनी मिळून मुकेशची पत्नी नीरज देवी यांचा गळा आवळून खून केला. यावेळी जीव वाचवण्यासाठी मुकेशने स्वतःला खोलीत कोंडून घेतलं. शुक्रवारी दुपारपासून त्याने स्वत:ला खोलीत कोंडून घेतलं होतं. हेही वाचा- खाजगी सावकारानं अल्पवयीन मुलीला दिल्या नरक यातना; पीडितेच्या प्रसूतीनंतर खळबळ पण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दरवाजा तोडून संशयित आरोपी पतीला बाहेर काढलं आहे. तसेच पोलिसांनी नीरज देवी यांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. दुसरीकडे, मृत महिलेचे वडील अमर सिंह यांनी मुकेशवर खुनाचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे. शवविच्छेदन अहवालात मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल. त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल, असं माहिती सीओ बीएस वीरकुमार यांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.