Home /News /maharashtra /

अपमानाचा घेतला भयंकर बदला; खिंडीत गाठून मालकाचा खेळ खल्लास, दरीत फेकला मृतदेह

अपमानाचा घेतला भयंकर बदला; खिंडीत गाठून मालकाचा खेळ खल्लास, दरीत फेकला मृतदेह

Crime in Raigad: सतत अपमान आणि हीन वागणूक दिल्याच्या कारणातून नोकराने मालकाच्या डोक्यात दगड घालून खून (murder by attack with stone) केला.

    रोहा, 09 जानेवारी: एखाद्या व्यक्तीचा झालेला अपमान तो कधीही विसरत नसतो. अपमानाचा बदला घेण्यासाठी तो केवळ एका संधीची वाट पाहात असतो. संधी मिळताच तो आपला बदला पूर्ण करतो. अशीच एक घटना रायगड (Raigad) जिल्ह्यातील रोहा (Roha) याठिकाणी घडली आहे. येथील एका नोकराने आपल्या मालकाची निर्घृण हत्या (owner brutal murder) केली आहे. सतत अपमान आणि हीन वागणूक दिल्याच्या कारणातून नोकराने मालकाच्या डोक्यात दगड घालून खून (murder by attack with stone) केला. त्यानंतर मालकाचा मृतदेह एका खोल दरीत टाकून फरार झाला. या घटनेला दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतर अखेर पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या (Accused arrested) आहेत. आरोपीनं गुन्ह्याची कबुली दिली आहे. या घटनेचा पुढील तपास रोहा पोलीस करत आहेत. विकास महादेव चव्हाण असं अटक केलेल्या 25 वर्षीय आरोपीचं नाव असून तो उस्मानाबाद जिल्ह्याच्या परांडा येथील रहिवासी आहे. आरोपी विकास हा गेल्या दोन वर्षांपासून फरार झाला होता. अखेर पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विकास हा अमित सिंग नावाच्या भंगार विक्री व्यावसायिकाकडे नोकरी करत होता. पण सिंग यांच्याकडून विकासला सतत हीन वागणूक मिळत होती. छोट्या छोट्या कारणातून विकासचा अपमान केला जात होता. हेही वाचा-पॉर्न VIDEO दाखवून विवाहितेवर अनैसर्गिक अत्याचार, पतीसह सासरच्यांवर FIR दाखल यामुळे विकासच्या मनात मालक अमित सिंग यांच्याबाबत प्रचंड राग होता. पण मालक असल्याने काहीही करता येत नव्हतं. दरम्यान घटनेच्या दिवशी 28 जानेवारी रोजी रात्री आठच्या सुमारास आरोपी विकास मालक अमित सिंग यांच्यासोबत रोहा ते नागोठणे रस्त्यावरून भिसे खिंडीतून दुचाकीने जात होते. यावेळी सिंग यांना लघुशंका आल्याने त्यांनी रस्त्याच्या कडेला दुचाकी थांबवली. याच संधीचा फायदा घेत विकास यानं अमित सिंग यांच्या डोक्यात दगड घालून त्यांचा खून केला. हेही वाचा-ओव्हरटेक करणं जीवावर बेतलं; पुण्यात गुणवान बॅडमिंटनपटू तरुणीचा दुर्दैवी अंत यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने अमित सिंग यांचा मृतदेह खोल दरीत फेकला. यानंतर तो घटनास्थळावरून फरार झाला. अमित सिंग यांची हत्या झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर, गेल्या दोन वर्षांपासून रोहा पोलीस आरोपीचा शोध घेत होते. पण त्याचा काहीही थांगपत्ता लागत नव्हता. अखेर आरोपी विकास काही कामानिमित्त रोहा याठिकाणी येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपी विकासला अटक केली आहे. आरोपी विकासने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. घटनेचा पुढील तपास रोहा पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Murder, Raigad

    पुढील बातम्या