बेगूसराय, 12 एप्रिल : देशभरात कोरोनाच्या (Covid - 19) वाढत्या संख्येमुळे लॉकडाऊन अधिक कडक करण्याचे निर्देशत देण्यात आले आहेत. बिहारमधील बेगूसराय येथे लॉकडाऊनदरम्यान (Lockdown) एक धक्कादायक बाब समोर आली आहे. बेगूसराय येथील चेरिया बरियापूर ठाण्यातील पोलिसावर एका तरुणाने लॉक़डाऊनचे उल्लंघन करण्याच्या आरोपाखाली जोरदार मारहाण केल्याचा आरोप लावला आहे. या मारहाणीत तरुणाच्या एका डोळ्याची दृष्टी गेल्याची माहिती समोर आली आहे. पीडित तरुणाने लॉकडाऊनचं उल्लंघन केल्याचा आरोप फेटाळला आहे. तो म्हणाला, जेव्हा मी शेतातून काम करुन घरी परतत होतो. त्यादरम्यान पोलिसांना मला मारहाण केली. यादरम्यान पोलिसांच्या हातातील काठी तरुणाच्या डोळ्याला लागली आणि त्यातच त्याची दृष्टी गेल्याचे सांगितले जात आहे. शेतीतून परतत होता तरुण बेगुसराय जिल्ह्यातील चेरिया बरियापुर ठाणे हद्दीतील खंजापूर गावातील निवासी नीरज कुमार याने स्थानिक पोलिसांवर मारहाणीबरोबरच अंधत्व आल्यामागे जबाबदार असल्याचा आरोप लावला आहे. नीरज कुमारचा आरोप आहे की, 8 एप्रिल रोजी तो शेतातून गव्हाची कापणी करुन घरी परतत होता. यादरम्यान चौकात काही खरेदी करण्यासाठी तो थांबला होता. तेव्हा पोलिसाने त्याची जोरदार मारहाण केली. 9 एप्रिलला रुग्णालयात गेल्यानंतर याबाबत खुलासा झाला. या प्रकरणात नीरज कुमारने एसपी यांना पत्रक पाठवून न्यायाची मागणी केली आहे. तरुणाने सोशल मीडियावरही आपले अनुभव शेअर केले आहे. या प्रकरणात ठाण्याचे प्रमुख पल्लव कुमार यांनी सांगितले की पोलिसांना पाहून पळ काढत असताना तरुणांना मार लागला आहे. यापूर्वी बेगुसराय जिल्ह्यात वाहतूक डिसीपींनी रस्त्यावर विनाकारण गाडी उभी करण्यावरुन एक बस चालकाचा डोळा फोडल्याची घटना घडली असल्याचे सांगितले जात आहे. संबंधित - भावाच्या मृत्यूनंतर डगमगली नाही, अंत्यसंस्कारानंतर कोरोनाच्या लढ्यात झाली तैनात वादातून महिलेने उचललं धक्कादायक पाऊल, पोटच्या लेकरांना दिलं गंगेत फेकून
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.