Home /News /national /

हात जोडून विनवणी करूनही चाटायला लावली थुंकी; BJP कार्यकर्त्यांकडून युवकाला अमानुष मारहाण

हात जोडून विनवणी करूनही चाटायला लावली थुंकी; BJP कार्यकर्त्यांकडून युवकाला अमानुष मारहाण

Crime News: भारतीय जनता पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी एका युवकाला बेदम मारहाण करून त्याला जमिनीवरील थुंकी चाटायला भाग पाडली आहे.

    धनबाद, 08 जानेवारी: भारतीय जनता पक्षाच्या (BJP) काही कार्यकर्त्यांनी एका युवकाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कार्यकर्ते एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी संबंधित युवकाला माफी मागायला भाग पाडून जमिनीवरील थुंकी चाटायला लावली (forced to lick spit) आहे. तसेच संबंधित व्यक्तीला 'जय श्री राम'च्या घोषणा द्यायला भाग पाडलं आहे. संबंधित घटना झारखंड (Jharkhand) राज्यातील धनबाद (Dhanbad) येथील आहे. या घटनेची दखल झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (CM hemant Soren) यांनी घेतली असून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत झालेल्या कुचराईनंतर धनबादमध्ये भाजपकडून 'सद्बुद्धी मौन आंदोलन'चं आयोजन करण्यात आलं होतं. याठिकाणी वाहतूक पोलिसांचा ताफाही घटनास्थळी तैनात होता. भाजपचे धनबादचे खासदार पीएन सिंह आणि भाजप आमदार राज सिन्हा यांनी देखील या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. दरम्यान येथील एका व्यक्तीने भाजपच्या प्रदेश अध्यक्षांना गोळी मारण्याची धमकी दिली. तसेच अपशब्द वापरले. हेही वाचा-धक्कादायक! माजी CMवर हल्ला करण्यासाठी सुरा घेऊन स्टेजवर पोहोचला तरुण यानंतर, संतापलेल्या भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी संबंधित व्यक्तीला बेदम मारहाण केली. तसेच त्याला उठाबशा  काढायला लावल्या आहेत. एवढ्यावर मन भरलं नाही म्हणून भाजप कार्यकर्त्यांनी संबंधित व्यक्तीला मारहाण करत त्याला जमिनीवरील थुंकी चाटायला भाग पाडलं आहे. तसेच 'जय श्री राम'च्या घोषणा द्यायला लावलं आहे. हेही वाचा-वृद्ध शेतकऱ्याने व्यासपीठावर BJP आमदाराच्या लगावली कानशिलात; Video Viral या धक्कादायक प्रकारानंतर अद्याप कोणीही पोलिसांत तक्रार दाखल केली नाही. मात्र या घटनेचे फोटो आणि व्हिडीओज व्हायरल झाल्यानंतर, या घटनेची दखल झारखंडचे मुख्यमंत्री सीएम हेमंत सोरेन यांनी घेतली आहे. तसेच ट्विट करून पोलिसांना कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. शांततेत जीवन जगणाऱ्या झारखंडवासीयांच्या राज्यात शत्रुत्वाला जागा असू शकत नाही, असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: BJP, Crime news, Jharkhand

    पुढील बातम्या