जाहिरात
मराठी बातम्या / देश / वृद्ध शेतकऱ्याने व्यासपीठावर जाऊन BJP आमदाराच्या लगावली कानशिलात; Video Viral

वृद्ध शेतकऱ्याने व्यासपीठावर जाऊन BJP आमदाराच्या लगावली कानशिलात; Video Viral

वृद्ध शेतकऱ्याने व्यासपीठावर जाऊन BJP आमदाराच्या लगावली कानशिलात; Video Viral

या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

उन्नाव, 7 जानेवारी : एका शेतकऱ्याने भाजप आमदार पंकज गुप्ता (BJP MLA Pankaj Gupta) यांना व्यासपीठावर सर्वांसमोर कानशीलात लगावली. हे पाहून आमदाराचे सुरक्षा रक्षक पुढे आले आणि शेतकऱ्याने व्यासपीठावरुन खाली पाठवलं. शेतकऱ्याबद्दल अद्याप अधिक माहिती समोर आलेली नाही. या घटनाक्रमाचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. (Farmer slams BJP MLA on stage; Video Viral) उन्नावमध्ये भाखजपा आमदार पंकज गुप्ताला शेतकरी नेत्याने कानशिलात लगावली. शुक्रवारी ही घटना घडली. उन्नावमध्ये भाजपचे आमदार पंकज गुप्ता एक जनसभेच्या कार्यक्रमात व्यासपीठावर बसले होते. 60 वर्षीय शेतकरी नेत्याचं नाव छत्रसाल असल्याचं सांगितलं जात आहे. त्यांनी भारतीय किसान यूनियनची टोपी घातल्याचं दिसत आहे. त्यांच्या एका हातात काठी होती.

ही घटना तीन दिवस जुनी असल्याचं सांगितलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आमदार माखी पोलीस ठाणे हद्दीतील ऐरा भदियारच्या मूर्तीचं अनावरण करण्यासाठी पोहोचले होते. तेथेच जनसभेचाही कार्यक्रम होता. आमदार व्यासपीठावर होते, तेव्हा एक वयस्क शेतकरी त्यांच्या जवळ जातो आणि कानशिलात लगावतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात