जाहिरात
मराठी बातम्या / देश / Crime Petrol पाहून वडिलांना मागितले 10 लाख, प्रेमविवाहासाठी तरुणीने प्रियकरासोबत मिळून रचला हा डाव

Crime Petrol पाहून वडिलांना मागितले 10 लाख, प्रेमविवाहासाठी तरुणीने प्रियकरासोबत मिळून रचला हा डाव

Crime Petrol पाहून वडिलांना मागितले 10 लाख, प्रेमविवाहासाठी तरुणीने प्रियकरासोबत मिळून रचला हा डाव

या तरुणीचे नाव मुस्कान अब्दुल सलाम आहे. सारोळा शहरातील रहिवासी आहे. तिच्या वडिलांनी तिच्या अपहरणांसदर्भात संदर्भात तक्रार दिली होती.

  • -MIN READ
  • Last Updated :

झालावाड, 11 जुलै : राजस्थानच्या झालावाड जिल्ह्यात एका तरुणीने तिच्या प्रियकरासह प्रेमविवाह (Love Marriage) करण्यासाठी स्वतःचे अपहरण करण्याचा कट (Conspiracy of Kidnap) रचला. इतकेच नाही तर वडिलांच्या मोबाईलवर मेसेज पाठवून 10 लाखांची खंडणी मागितली. मात्र, पोलिसांनी तरुणी आणि तिच्या प्रियकराचा हा कट हाणून पाडला. क्राईम पेट्रोल (Crime Petrol) ही मालिका पाहिल्यानंतर मुलीने तिच्या अपहरणाचा कट रचल्याचे तपासात समोर आले आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - झालवाड महिला ठाण्याच्या पोलिसांनी सांगितले की, या तरुणीचे नाव मुस्कान अब्दुल सलाम आहे. सारोळा शहरातील रहिवासी आहे. तिच्या वडिलांनी तिच्या अपहरणांसदर्भात संदर्भात तक्रार दिली होती. अब्दुल सलाम यांनी आपल्या तक्रारीत सांगितले की, 7 जुलै रोजी त्यांनी मुलगी मुस्कान हिला झालरापाटन येथील एका खासगी महाविद्यालयात एमए फायनलचा पेपर देण्यासाठी आणले होते. मात्र, काही वेळाने त्यांच्या मोबाईलवर मुलीचा फोटो आला. त्याच्यात अपहरणाबद्दल लिहिले होते. यासोबतच 10 लाख रुपयांची खंडणीही मागितली होती. याप्रकरणी महिला पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. ही तक्रार मिळाल्यानंतर झालावाडच्या डीएसपीसह महिला ठाणे पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. यासोबतच त्याच्या मोबाईलचे लोकेशन ट्रेस करण्यात आले. दरम्यान, रविवारी ही मुलगी एका मुलासोबत दुचाकीवरून कोटा येथे गेल्याचे पोलिसांना समजले. यानंतर पोलिसांनी तरुणी मुस्कान आणि तिचा प्रियकर देवेंद्र चौधरी यांचा पाठलाग करून त्यांना अटक केली. हेही वाचा -  पती शेकडो मैल दूर, इकडे काकू-पुतण्याचं जुळलं सूत; मात्र, प्रेमाचा The End ठरला दुर्देवी! मुस्कान आणि देवेंद्र हे दोघेही सारोळा शहरातील शेजारी राहत असल्याचे तपासात समोर आले. दोघेही एकमेकांवर प्रेम करत असून त्यांना लग्न करायचे आहे. मात्र, त्यांच्या कुटुंबीयांना हे नाते मान्य नव्हते. त्यामुळेच त्याने क्राईम पेट्रोलची मालिका पाहून अपहरणाची ही योजना आखली. अपहरणाची बातमी ऐकून आपले वडील घाबरतील आणि आपला शोध घेणार नाहीत, असे तिला वाटल्याचे मुस्कानने सांगितले. यादरम्यान ते कोर्टात जाऊन लग्न करणार होते. मात्र, त्याआधीच त्यांना पोलिसांनी पकडले. सध्या महिला पोलीस ठाण्यात प्रेमी युगुलाची चौकशी सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात