मराठी बातम्या /बातम्या /देश /

पती शेकडो मैल दूर, इकडे काकू-पुतण्याचं जुळलं सूत; मात्र, प्रेमाचा The End ठरला दुर्देवी!

पती शेकडो मैल दूर, इकडे काकू-पुतण्याचं जुळलं सूत; मात्र, प्रेमाचा The End ठरला दुर्देवी!

काकू आणि पुतणे एकाच घरात राहत होते. लक्ष्मी देवीचा विवाह सुमारे 3 वर्षांपूर्वी झाला होता. तिचे पती परदेशात राहतात.

काकू आणि पुतणे एकाच घरात राहत होते. लक्ष्मी देवीचा विवाह सुमारे 3 वर्षांपूर्वी झाला होता. तिचे पती परदेशात राहतात.

काकू आणि पुतणे एकाच घरात राहत होते. लक्ष्मी देवीचा विवाह सुमारे 3 वर्षांपूर्वी झाला होता. तिचे पती परदेशात राहतात.

  • Published by:  News18 Desk
सीकर, 10 जुलै : राजस्थान राज्यातील सिकर (Sikar Rajasthan) जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रेम प्रसंगामुळे (Love Affair) एका काकू आणि पुतण्याने विहिरीत उडी घेत आत्महत्या (Suicide) केली. ही घटना रविवारी सकाळच्या सुमारास घडली. (Aunty Nephew Love Affair) या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. राजस्थानमध्ये नात्याला काळीमा फासण्याऱ्या अनेक घटना याआधी घडल्या आहे. आता त्या घटनांमध्ये आणखी या घटनेची भर पडली आहे. (Aunty Nephew Suicide) काय आहे संपूर्ण प्रकरण - पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बलारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिसनाऊ गावात रविवारी सकाळी ही घटना घडली. तिथल्या प्रेमप्रकरणातून काकू आणि तिच्या पुतण्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. सुरेंद्र बलाई आणि त्याची काकू लक्ष्मी देवी अशी मृतांची नावे आहेत. या दोघांचे मृतदेह रविवारी सकाळी विहिरीत पडलेले आढळून आले. या घटनेची माहिती ग्रामस्थांना कळताच त्यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात माहिती दिली. यावरून पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने घटनास्थळ गाठून दोघांचेही मृतदेह विहिरीतून बाहेर काढले. बलारा पोलीस ठाण्याचे प्रमुख बाबूलाल मीणा यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांनी पहाटे येथे येऊन विहिरीत उडी घेतली. काकू आणि पुतणे एकाच घरात राहत होते. लक्ष्मी देवीचा विवाह सुमारे 3 वर्षांपूर्वी झाला होता. तिचे पती परदेशात राहतात. त्यांना 15 महिन्यांची मुलगीही आहे. पती परदेशात राहत असल्याने त्याचा फायदा घेऊन इथे काकू आणि पुतण्याचे सूत जूळले होते. मात्र, सोबत राहू शकत नसल्यामुळे त्या दोघांनी आत्महत्येचा निर्णय घेतला. या प्रकरणाचा तपास उपविभागीय दंडाधिकारी करत आहेत. हेही वाचा - 'माझी, माझी' म्हणत एका तरुणीसाठी आपसात भिडले 2 तरुण; पण समोर आलं तिचं भलतंच सत्य काही दिवसांपूर्वी सासू-जावयाची आत्महत्या - काही दिवसांपूर्वी बाडमेर जिल्ह्यात प्रेमप्रकरणातून सासू आणि जावयाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. दोघांचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळले. या घटनेने परिसरातही खळबळ उडाली होती. बारमेर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेत जावई सासूपेक्षा 15 वर्षांनी लहान होता. दोघेही एकत्र राहू शकले नाहीत त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली. याआधीही राज्यातील इतर भागातही प्रेमप्रकरणातून अनेकांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत.
First published:

Tags: Crime news, Love story, Rajasthan

पुढील बातम्या