जाहिरात
मराठी बातम्या / देश / रात्रीच्या जेवणानंतर खाल्ला आंबा; काहीच वेळात सुरू झाली डोकेदुखी अन् तरुणीचा धक्कादायक शेवट

रात्रीच्या जेवणानंतर खाल्ला आंबा; काहीच वेळात सुरू झाली डोकेदुखी अन् तरुणीचा धक्कादायक शेवट

आंबा खाल्ल्यानंतर काहीच वेळात झाला मृत्यू

आंबा खाल्ल्यानंतर काहीच वेळात झाला मृत्यू

रात्री उशिरा अर्चना नावाच्या तरुणीने जेवणानंतर आंबे खाल्ले होते. यानंतर काहीच वेळात तिची प्रकृती बिघडू लागली. तीव्र डोकेदुखीचा त्रास होऊ लागला

  • -MIN READ Madhya Pradesh
  • Last Updated :

भोपाळ 12 जुलै : आंबा खाल्ल्यानंतर एका तरुणीची प्रकृती बिघडली. यानंतर घरच्यांनी तिला रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचारादरम्यान तिथेच तिचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण मध्य प्रदेशच्या इंदूरमधील राजेंद्र नगर ठाण्याच्या क्षेत्रातील बिजलपूर येथील आहे. इथे रात्री उशिरा अर्चना नावाच्या तरुणीने जेवणानंतर आंबे खाल्ले होते. यानंतर काहीच वेळात तिची प्रकृती बिघडू लागली. तीव्र डोकेदुखीचा त्रास होऊ लागला. बराच वेळ हा त्रास कायम राहिल्याने घरच्यांनी तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. तिथेच तिचा मृत्यू झाला. या घटनेनं एकच खळबळ उडाली. नातवासाठी आजोबांनी घातला जीव धोक्यात! लेकानेच केलं भयानक कांड अर्चनाचे सासरे बन्सीलाल अटेरिया यांनी सांगितलं की, आंबे खाल्ल्यानंतर अर्चनाला डोकेदुखी होत होती. यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जिथे तिचा बीपी सतत कमी होत होता आणि तिथेच अचानक तिचा मृत्यू झाला. त्यांनी सांगितलं की, यापूर्वी गावातील अनेक लोक आंबे खाल्ल्याने आजारी पडले होते. आंबा खाल्ल्यानंतर अर्चानाही आजारी पडली आणि तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. आज तकने याबाबतचं वृत्त दिलं आहे बिकट परिस्थिती.. आईचा बालविवाह, मुलीवरही आली तिच वेळ; शेवटी मायच म्हणाली, ‘नको करू लग्न’ पोलीस अधिकारी राघवेंद्र सिंह चौहान यांनी सांगितलं की, अर्चना आंबे खाल्ल्यानंतर आजारी पडली होती. यानंतर कुटुंबीयांनी तिला खासगी रुग्णालयात दाखल केलं. जिथे तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. अहवाल आल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल. मात्र या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात