छ. संभाजीनगर, 12 जुलै: मुलीच्या लग्नाचं वय 18 तर मुलाचं 21 करत सरकारनं बालविवाहवर बंदी घातली आहे. तरीही अनेक ठिकाणी अजूनही बालविवाह केला जातो. कुठे जबदस्तीनं तर कुठे परिस्थितीमुळे तर काही ठिकाणी कायदाच माहित नसल्यामुळे असे प्रकार घडतात. नुकताच असाच काहीसा प्रकार छत्रपती संभाजीनगरमधून उघड झाला. चाईल्ड हेल्पलाईनच्या मदतीनं हा बालविवाह थांबवण्यात आला. …आणि आई म्हणाली लग्न कॅन्सल करु. छत्रपती संभाजीनगरमधील मुकुंदवाडीमध्ये बालविवाह लावत असल्याचा प्रकार समोर आला. याची माहिती मराठवाडा ग्रामीण संस्थेतील चाईल्ड हेल्पलाईनंबरवर फोन करुन देण्यात आली. सकाळी 8 च्या सुमारास चाईल्ड हेल्पलाईन नंबर 1098 वाजला आणि बालविवाहाची माहिती देण्यात आली. संस्थेचे कार्यकर्ते उमेश श्रीवास्तव यांनी तात्काळ मुकुंदवाडी पोलिसांत धाव घेतली. त्यानंतर पोलीस आणि दामिनी पथकातील महिला पोलिसांनी मुलीच्या घरी जात हा विवाह रोखला.
पोलीस आणि दामिनी पथक घडनास्थळी पोहोचले तेव्हा मुलीच्या घरी हळदीचा कार्यक्रम सुरु होता. त्यांनी मुलीच्या आईला 2006 चा बालविवाह कायदा समजावून सांगितला. बालविवाह केल्यास दोन वर्षाची शिक्षा आणि 1 लाखांचा दंड भरावा लागेल असा इशारा दिला. त्यानंतर मुलीच्या आईनंच हा विवाह थांबवला आणि दिवाळीनंतर लग्न लावेल असं सांगितलं. घाबरलेली तरुणी आपलं आधारकार्ड दाखवत होती. म्हणाली माझं वय पूर्ण आहे मात्र जन्मतारखेनुसार पाहिल्यावर ती अजूनही 17 वर्ष 9 महिन्यांचीच होती. त्यानंतर आईनंच गयावया करत लग्न कॅन्सल करते सांगितलं. घरच्या नाजून परिस्थितीमुळे आई आपल्या मुलीचं लग्न लावत होती. एकटी आई आणि तेही मोलमजुरी करणारी. तिनं कसंबसं आपल्या लेकीचं दहावी पर्यंतचं शिक्षण केलं आणि त्यानंतर हे पहिलं चांगलं स्थळ आल्यामुळे लग्नाला तयार झाली. मुलगाही मुंबईत मॉलमध्ये नोकरी करणारा होता. मुलानेही जन्मसाल पाहून लग्नास होकार दिला. त्यानं आपली चूक झाल्याचं स्विकारलं. मुलीला महिला व बालविकास समितीपुढे तिचं काऊन्सलिंग करण्यात आलं आणि पुढच्या तारखेस हजर राहण्यास सांगितलं. Viral News : दोन मैत्रीणींना एकमेकींवर झालं प्रेम, सत्य समोर येताच घडलं असं की…. चौकशीदरम्यान मुलीची 34 वर्षांच्या आई तिचाही बालविवाह झाल्याचं उघडकीस आलं. आता पोलिसांनी मुलीला आणि तिच्या आईला बालविवाह न करण्याची ताकिद दिली आहे. वय पूर्ण झाल्याशिवाय लग्न करु नका असं ठणकाहून सांगितलं.