• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • हरियाणातील सुलतान रेड्याचा दुर्देवी अंत; एका जत्रेत 21 कोटींमध्ये विकण्याची केली होती मागणी

हरियाणातील सुलतान रेड्याचा दुर्देवी अंत; एका जत्रेत 21 कोटींमध्ये विकण्याची केली होती मागणी

सुलतानच्या वीर्य विक्रीतूनही मालकाने लाखोंमध्ये कमाई केली होती.

 • Share this:
  हरियाणा, 27 सप्टेंबर : हरियाणातल्या (Haryana) कैथल जिल्ह्यातल्या (Kaithal district) बुडाखेडा गावातल्या सुलतान रेड्याने (sultan-bull) हरियाणाची कीर्ती जगात पोहोचवली. या रेड्याचं आता हृदयविकाराच्या झटक्याने (heart attack) निधन (died) झालं आहे. त्यामुळे या रेड्याचं पालन करणाऱ्या कुटुंबावरच नाही, तर संपूर्ण बुडाखेडा गावावर शोककळा पसरली आहे. सुलतानच्या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 'सुलतान नावाचा हा रेडा राजेशाही थाटात आयुष्य जगला. बुडाखेडा गावातल्या सुलतान रेड्याने केवळ कैथलचंच नव्हे, तर संपूर्ण हरियाणाचं नाव प्रसिद्ध केलं. सुलतानला मी लहानपणापासून आपल्या मुलाप्रमाणे सांभाळलं होतं. सुलतानप्रमाणे कोणीही नव्हतं आणि कदाचित कोणीही नसेल. त्यामुळे आज संपूर्ण उत्तर हरयाणातले लोक मला ओळखतात,' अशा शब्दांत सुलतानचे मालक नरेश यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. नरेश यांनी सुलतानला रोहतकमधून 2 लाख 40 हजार रुपयांना खरेदी केलं होतं. त्यांनी सुलतानला लहानपणापासून वाढवलं. त्याचे स्वतःच्या मुलासारखे लाड केले. त्यामुळे आज त्याच्या जाण्यानंतर कुटुंबाला त्याची मोठी उणीव भासत आहे. सुलतानची रिकामी खुंटी नरेश यांना दुःखी करते. ते दिवसातला बराच वेळ त्याच्या फोटोकडे आणि पुरस्काराकडे पाहत राहतात. हे ही वाचा-सुसाट कारची घराच्या कंपाऊंडला जोरदार धडक; भीषण अपघाताताचा LIVE VIDEO जनावरांच्या प्रदर्शनात दहशत निर्माण करणाऱ्या सुलतानने नरेश आणि त्यांच्या कुटुंबाला मोठी प्रसिद्धी मिळवून दिली. सुलतान प्रत्येक स्पर्धेत विजयी झाला आहे. हरियाणाच्या एका म्युझिक अल्बममध्येही सुलतानचं दिसला आहे. नरेश यांनी म्हटलं, की सुलतानच्या जाण्याचं दु:ख इतकं आहे, की त्याची आठवण हृदयातून जात नाही. आता कुणाचं तरी संगोपन करून सुलतानसारखं त्याला बनवण्याचा प्रयत्न करू; पण त्याची जागा कोणी भरून काढणार नाही. नरेश यांच्या डोळ्यासमोरच सुलतानचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्याच्या निधनाबद्दल दु: ख व्यक्त करण्यासाठी दूरवरून प्राणीप्रेमी तिथं येत आहेत. नरेश यांना सुलतानच्या वीर्यापासून लाखो रुपये कमाई होत होती. सुलतान एका वर्षात वीर्याचे 30 हजार डोस देत असे. हे वीर्य लाखो रुपयांना विकलं गेलं. 2013 मध्ये झज्जर, कर्नाल आणि हिस्सार इथे झालेल्या राष्ट्रीय पशुसौंदर्य स्पर्धेत सुलतान राष्ट्रीय विजेता ठरला आहे. राजस्थानातल्या पुष्कर जत्रेत एका प्राणीप्रेमीने सुलतानला 21 कोटी रुपयांमध्ये मागितलं होतं; मात्र नरेश यांनी सुलतानला विकण्यास नकार दिला. सुलतान हा आपला मुलगा आहे आणि मुलाची कोणी किंमत करत नाही, असं नरेश यांनी यावेळी सांगितलं होतं. नरेश आणि त्यांचे भाऊ सुलतनाची देखभाल आपल्या मुलांसारखी करत होते.
  First published: