जाहिरात
मराठी बातम्या / देश / चांदीची तार, सोन्याची पॉलिश; बनारसी साडीची किंमत एकदा ऐकाच!

चांदीची तार, सोन्याची पॉलिश; बनारसी साडीची किंमत एकदा ऐकाच!

चांदीची तार, सोन्याची पॉलिश; बनारसी साडीची किंमत एकदा ऐकाच!

चांदीची तार, सोन्याची पॉलिश; बनारसी साडीची किंमत एकदा ऐकाच!

पैठणीप्रमाणेच बाजारात बनारसी साड्यांचीही मोठी क्रेझ आहे. बनारसमध्ये विकल्या जाणाऱ्या बनारसी साड्यांची किंमत लाखोंमध्ये मोजली जाते.

  • -MIN READ Local18 Varanasi,Uttar Pradesh
  • Last Updated :

अभिषेक जायसवाल, प्रतिनिधी वाराणसी 3 जून : पदरावर नाचरा मोर हवा. केवळ या हट्टापायी अनेकांना पैठणी विकत घेण्याचा मोह होतो. पैठणीप्रमाणेच बाजारात बनारसी साड्यांचीही मोठी क्रेझ आहे. तुम्हाला माहितीये का, बनारसमध्ये विकल्या जाणाऱ्या बनारसी साड्यांची किंमत लाखोंमध्ये मोजली जाते. या साड्यांमध्ये नेमकं असं काय असतं की त्या अव्वाच्या सव्वा दरात विकल्या जातात…पाहूया.

News18लोकमत
News18लोकमत

या साड्या शिवण्यासाठी मशीनचा अजिबात वापर केला जात नाही. हे शिवणकाम पूर्णपणे हातानेच केलं जातं. पूर्णपणे सिल्कच्या या साड्यांवर चांदीच्या तारांचे नक्षीकाम करून वर सोन्याची पॉलिश दिली जाते. या शिवणकामासाठी तब्बल 6 ते 7 महिन्यांचा कालावधी लागतो. देशभरात इथून साड्या पाठवल्या जातात. खरी सावित्री : लव्ह मॅरेज केलं अन् असं काही घडलं की सगळं आयुष्यच पालटून गेलं! पाहा Video विशेष म्हणजे ऑर्डरनंतरच या साड्या शिवल्या जातात. त्यांचं नक्षीकाम जणू डोळे दिपवणारं असतं. या साड्यांची किंमत जवळपास 10 लाख रुपये इतकी असते. खरंतर याठिकाणी यापेक्षाही महागड्या साड्या मिळतात. ज्यांवर सोन्यासह हिरे, माणिकांचं नक्षीकाम केलेलं असतं. देशभरातल्या सेलिब्रिटी मंडळींकडून या साड्यांना मोठी मागणी असते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात