लखनऊ, 17 मार्च: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे 2022 (Uttar Pradesh Assembly Election 2022) चे निकाल जाहीर झाले आहेत. राज्यात भाजप स्पष्ट बहुमतानं सत्तेत आलं आहे. आता योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. शपथविधी सोहळा (swearing ceremony) भव्यदिव्य करण्यासाठी सर्व तयारी सुरू आहे. एकना स्टेडियमवर हा कार्यक्रम होणार आहे. योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला 45 हजार लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमासाठी 200 व्हीव्हीआयपी पाहुण्यांची यादी तयार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी, प्रियंका गांधी वाड्रा, सोनिया गांधी, माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, मुलायम सिंह यादव, बसपा सुप्रीमो मायावती यांच्यासह सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांना शपथविधी कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं जाणार आहे. यासोबतच भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्रीही शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
भंडाऱ्याला गेली अन् मिळाली आयुष्यभराची जखम, मुलीला मिळाल्या नरकयातना
मिळालेल्या माहितीनुसार, योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी विरोधी पक्षांच्या सर्व नेत्यांना निमंत्रित करण्याची तयारी सुरू आहे. शपथविधीला 45 हजार लोक उपस्थित राहू शकतील, असे सांगण्यात येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 200 हून अधिक VVIP पाहुण्यांची यादीही तयार करण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी विरोधी पक्षांच्या नेत्यांनाही आमंत्रित करण्यात येणार आहे. सोनिया गांधी, प्रियांका गांधी, राहुल गांधी, मुलायम सिंह यादव, अखिलेश यादव, मायावती यांच्यासह अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांना शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केलं जाणार आहे. याशिवाय राज्यभरातील अशा लाभार्थ्यांनाही आमंत्रित करण्यात येणार आहे, ज्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांचा लाभ झाला आहे.
भाजपचा ऐतिहासिक विजय
उत्तर प्रदेशमध्ये नवीन सरकार स्थापनेची तयारी सुरू झाली आहे. होळीनंतर योगी आदित्यनाथ सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. यावेळी स्मृती उपवन ऐवजी अटलबिहारी वाजपेयी एकना स्टेडियमवर शपथविधी सोहळा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि अनेक राज्यांचे मुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
यूपीमध्ये 37 वर्षांनंतर असा प्रकार घडला आहे, जेव्हा एका पक्षाचे सलग दुसऱ्यांदा सरकार बनणार आहे. अशा परिस्थितीत हा ऐतिहासिक सोहळा भव्यदिव्य करण्यासाठी भाजपने तयारी केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Assembly Election, Uttar pradesh news, Yogi Aadityanath