8 मार्च, 2020 : आर्थिक संकटात अडकलेल्या येस बँकेत (Yes Bank) भगवान जगन्नाथ पुरी (Jagannath Puri Temple) यांच्या नावावर जमा असलेले 545 कोटी रुपयेदेखील अडचणीत सापडले आहेत. येस बँकेचा घोटाळा आणि भगवान जगन्नाथ मंदिराच्या अडकलेल्या पैशांवरुन बॉलिवूड अभिनेते प्रकाश राज यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. अभिनेते प्रकाश राज हे समाज माध्यमांवर कायम विविध विषयांवर व्यक्त होत असतात. त्यांनी येस बँकेचा घोटाळा आणि त्यात जगन्नाथ मंदिराच्या अडकलेल्या पैशांवरुन टिपण्णी केली आहे. त्यांनी केलेलं हे ट्विट सध्या व्हायरल झालं आहे. त्यांनी ट्विट केलं आहे, की ‘हे भगवान, तुम्हालाही रांगेत उभं केलं. जगन्नाथ पुरी मंदिराचे 545 कोटी रुपय़े येस बँकेत अडकल्यामुळे भक्तांची चिंता वाढली असेल’. प्रकाश राज यांचं हे ट्विट Social Media वर व्हायरल झालं आहे. जगन्नाथ पुरीचे येस बँकेत जमा निधीसंदर्भात ओदिशात विरोधीपक्षाने मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी या प्रकरणात स्पष्टीकरण देण्याची मागणी केली आहे.
HEY BHAGWAN..... Aap ko bhi line pe khadadiya....BHAKTS MUST BE CRAZY #JustAsking Concern Over Puri Jagannath Temple's Rs 545 Crore Deposited In Yes Bankhttps://t.co/0oOvL10sxD
— Prakash Raj (@prakashraaj) March 7, 2020
कायदे मंत्री प्रताप जेना यांनी सांगितल्यानुसार मार्च महिन्याच्या शेवटपर्यंत जगन्नाथ पुरीचे पैसे राष्ट्रीयकृत बँकेत स्थानांतरित करण्याची घोषणा पुरेशी नाही, असा आरोप विरोध पक्षाकडून करण्यात आला आहे. काँग्रेस नेता नरसिंह मिश्रा म्हणाले, हा चिंतेचा विषय आहे. कारण संपूर्ण देशातील लाखो भक्तांची भावना याच्याशी जोड़लेली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याबाबत स्पष्टीकरण देण्याची गरज आहे. संबंधित - Yes Bank चे सीईओ राणा कपूर यांना ईडीने केली अटक