मुंबई, 08 मार्च : येस बँकेवर (Yes Bank Crisis) सरकारने आर्थिक निर्बंध लादल्यानंतर देशभरात मोठी खळबळ उडाली आहे. दीवान हाउसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (डीएचएफएल) च्या मनी लाँड्रिंग प्रकरणात एनफोर्समेंट डायरेक्टरेट (ईडी) ने येस बँकेचे सीईओ राणा कपूर यांना रविवारी पहाटे अटक केली. ईडी अधिकार्यांनी सुमारे 20 तासांच्या चौकशीनंतर त्यांना अटक केली आहे.
रविवारी सकाळी अकराच्या सुमारास राणा कपूर यांना न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. शनिवारी ईडीने राणा कपूर यांची वरीळीतील समुद्रमहाल निवासस्थानी चौकशी सुरू होती. येस बँकेच्या प्रमोटर राणा कपूर आणि त्यांच्या दोन मुलींची डमी कंपनी अर्बन बँक व्हेन्चर्स या घोटाळ्यांमधून 600 कोटी रुपये मिळाले होते, याची चौकशी ईडी चौकशी करीत आहे.
भ्रष्टाचारामध्ये सामील असलेल्या डीएचएफएलने बँकेने दिलेल्या 4,450 कोटी रुपयांसाठी कंपनीला पैसे दिले, ज्याची चौकशी सुरू होती. ईडी अधिकाऱ्यांनी सांगितलं की, येस बँकेनं डीएचएफएलला 3,750 कोटी रुपये आणि डीएचएफएलच्या नियंत्रणाखाली असलेल्या आरकेडब्ल्यू डेव्हलपर्सना 750 कोटींचे कर्ज दिलं आहे.
शुक्रवारी बँकेचे सीईओ राणा कपूर यांच्या घरावर छापे मारण्यात आले होते. अंमलबजावणी संचालनालया(ईडी)ने राणा कपूर यांच्या घरावर छापे मारले होते. ईडीने राणा कपूर यांच्या वरळी येथील घरावर छापे मारले. डीएचएलएफ(DHFL)ला कर्ज दिल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली होती. येस बँकेनं DHFL ला तब्बल 3600 कोटींचं कर्ज दिलं होतं.
Mumbai: Enforcement Directorate (ED) arrests #YesBank founder #RanaKapoor. Visuals from ED office where he was being questioned. pic.twitter.com/K7GSr7gCl1
— ANI (@ANI) March 7, 2020
राणा कपूर यांनी अधिकारांचा गैरवापर करुन हजारो कोटी रुपये परदेशात पाठवले. त्याच सोबत काही कंपन्यांना नियम बाह्य अर्थ साह्य केलं असून कानपूर, दिल्ली इथं दाखल एका प्रकरणी ईडी तपास करत होती. त्यातून राणा कपूर यांचे नाव समोर आलंय. राणा कपूर यांच्या घरातील एका व्यक्तीच्या खात्यात वेळो वेळी मोठी रक्कम परदेशातून आल्याची माहिती देखील ईडीला सूत्रांनी दिली. फक्त राणा कपूरच नाही तर यस बँकेचे आणखी 3 अधिकारी ईडीच्या रडारवर असून लवकर त्यांच्यावर देखील ईडीची गाज पडेल.
दरम्यान, येस बँकेवर आरबीआयने निर्बंध लादल्यानंतर खातेदारांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. खातेदारांना महिना भरात फक्त 50 हजार रुपये काढण्याची मुभा देण्यात आली आहे. त्याचा परिणाम येस बँकेत पाहायला मिळतोय. ठाणे, भिवंडी, पुणे तसंच राज्यभरातील येस बँकेच्या इतर शाखांमध्ये खातेदारांनी गर्दी केली होती. खातेदारांनी घाबरून जाऊ नये, असं आवाहन करण्यात येत होतं. बँकेवर आलेल्या निर्बंधामुळं आता आपल्या पैशांचं काय होणार हा प्रश्न खातेदारांना सतावतोय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.