जाहिरात
मराठी बातम्या / देश / आपला ‘O Blood Group’ आहे असं समजून केलं रक्तदान; मात्र, जगातला दुर्मीळ रक्तगट असल्याचं आलं समोर

आपला ‘O Blood Group’ आहे असं समजून केलं रक्तदान; मात्र, जगातला दुर्मीळ रक्तगट असल्याचं आलं समोर

आपला ‘O Blood Group’ आहे असं समजून केलं रक्तदान; मात्र, जगातला दुर्मीळ रक्तगट असल्याचं आलं समोर

30 वर्षीय अमन जैन यांनी अहमदाबादच्या शेल्बी हॉस्पिटलमध्ये (Shalby Hospital, Ahmedabad) रक्तदान केलं होतं. त्यांच्या रक्ताच्या नमुन्याची तपासणी केली असता त्यांच्या रक्ताच्या नमुन्यात असामान्य वैशिष्ट्यं आढळून आली.

  • -MIN READ
  • Last Updated :

अहमदाबाद, 7 एप्रिल : एका 30 वर्षीय तरुणानं आपला रक्तगट ‘O’ (Blood Group ‘O’) आहे, असं समजून रक्तदान (Blood Donation) केलं होतं, मात्र तपासणीत त्याचा रक्तगट एईएल (Blood Groud AEL ) असल्याचं आढळून आलं. हा रक्तगट दुर्मीळ मानला जातो. जगातल्या फक्त काही लोकांचाच हा रक्तगट आहे. 30 वर्षीय अमन जैन यांनी आपला रक्तगट ‘ओ’ आहे, असं समजून रक्तदान केलं होतं. त्यांनी अहमदाबादच्या शेल्बी हॉस्पिटलमध्ये (Shalby Hospital, Ahmedabad) रक्तदान केलं होतं. त्यांच्या रक्ताच्या नमुन्याची तपासणी केली असता त्यांच्या रक्ताच्या नमुन्यात असामान्य वैशिष्ट्यं आढळून आली. यानंतर रक्ताच्या नमुन्याची पुढील चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या चाचणीत त्यांचा रक्तगट एईएल असल्याचं आढळून आलं. हा रक्तगट दुर्मिळ आहे. हे वाचा -  सत्तरीतले आजोबा आणि 65 वर्षांच्या आजींच्या अजब प्रेमाची गजब कहाणी टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, हॉस्पिटल व्यवस्थापनाचं म्हणणं आहे की, राज्यात या रक्तगटाची कोणतीही कागदोपत्री नोंद नाही. रक्तपेढीचे अधिकारी डॉ. यशा पारीख आणि शेल्बी हॉस्पिटलच्या पॅथॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. प्रभात शर्मा म्हणतात की A आणि B अँटीजन असलेले रक्तगट दुर्मिळ मानले जातात. परंतु, A अँटीजनचा AL हा प्रकार अत्यंत दुर्मिळ आहे. हे वाचा -  चोरानं मंदिरातले दागिने चोरण्यासाठी खिडकी फोडली, पण नंतर मिळाली अशी काही शिक्षा जगात फक्त काही प्रकरणं आलीत समोर शेल्बी हॉस्पिटलचे सीएमडी डॉ. विक्रम शाह सांगतात की, सध्या या रक्तगटाची अणु-रेणूसंरचना (Molecular Mechanism) समजून घेण्यासाठी अभ्यास केला जात आहे. रेडक्रॉस रक्तपेढीचे संचालक डॉ.विश्वास अमानी यांनी सांगितलं की, AL हा दुर्मिळ रक्तगटांपैकी एक मानला जातो आणि जगात याची फक्त काही प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात