जगातील सर्वात वयोवृद्ध योगा प्रशिक्षक काळाच्या पडद्याआड, 2019 मध्ये पद्मश्रीने सन्मान

जगातील सर्वात वयोवृद्ध योगा प्रशिक्षक काळाच्या पडद्याआड, 2019 मध्ये पद्मश्रीने सन्मान

अमेरिकेतील योगा प्रशिक्षक ताओ पोरचोन लिंच यांनी वयाच्या 102व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. ताओ पोरचोन लिंच या जगातील सर्वात वयोवृद्ध योगा प्रशिक्षक होत्या.

  • Share this:

न्यूयॉर्क, 22 फेब्रुवारी : आयुष्यात काही करण्याची जिद्द असेल तर आपण ते साध्य करू शकतो. आणि ते साध्य करताना वयाचंही बंधन येत नाही. प्रेमाला वय नसतं असं म्हणतात. मग ते प्रेम व्यक्तीप्रती असो वा कामाप्रती. अशाच आपल्या कामावर वेडासारख्या प्रेम करणाऱ्या जगातील सर्वात वयोवृद्ध योगा प्रशिक्षकाचं निधन झालं आहे. अमेरिकेतील योगा प्रशिक्षक ताओ पोरचोन लिंच यांनी वयाच्या 102व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. ताओ पोरचोन लिंच या जगातील सर्वात वयोवृद्ध योगा प्रशिक्षक होत्या आणि गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही त्यांच्या नावाची नोंद आहे. तर भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्रीने देऊनही ताओ यांना सन्मानित करण्यात आलं होतं.

ताओ पोरचोन लिंच यांचा जन्म 13 ऑगस्ट 1918 साली भारतामध्ये झाला. त्यानंतर त्या अमेरिकामध्ये स्थायिक झाल्या. ताओ यांचे वडिल फ्रान्सचे होते तर ताओंची आई मणिपूरमध्ये राहणाऱ्या होत्या. ताओ 7 महिन्याच्या असताना त्यांच्या आईचं निधन झालं. आईच्या निधनानंतर नातेवाईकांनी ताओ यांची देखभाल केली. ताओ यांनी 7 वर्षापासून योगा करायला सुरुवात केली. आणि तरुण वयात त्या एक योगा प्रशिक्षक झाल्या होत्या. ताओ यांनी जगातील प्रसिद्ध अशा योगा प्रशिक्षकांकडून योगाचं प्रशिक्षण घेतलं होतं. श्री अरबिंदो, इंदिरा देवी आणि दीपक चोपडा अशा प्रख्यात योगा प्रशिक्षकांकडून योगाचं शिक्षण घेतलं होतं. अमेरिका आणि फ्रान्समध्ये त्यांनी 40हून अधिक वर्ष योगाचं प्रशिक्षण दिलं. त्या केवळ एक योगा प्रशिक्षकच नाही तर एक डान्सर आणि अभिनेत्रीही होत्या. त्यांनी काही पुस्तकही लिहिली होती.

View this post on Instagram

Whatever you have in your heart, if it is good, do it today. Don’t procrastinate. ❤️ #Tao💯

A post shared by Tao Porchon-Lynch (@taoporchonlynch100) on

काही वर्षांपूर्वी ताओ या अमेरिकेत गॉट टॅलेंटमध्ये बॉल डान्सर म्हणून सहभागी झाल्या होत्या. यादरम्यान भारत सरकारने त्यांना पद्मश्री देऊनही सन्मानित केलं होतं. शेवटच्या श्वासापर्यंत ताओ या योगाचं प्रशिक्षण देत होत्या. वय झालं तरी ताओ यांना त्यांच योगावर असणारं प्रेम स्वस्थ बसू देत नव्हतं. त्यामुळे त्या शेवटपर्यंत डान्स आणि योगाचं प्रशिक्षण देत होत्या.

ताओ पोरचोन लिंच यांच्या जाण्याने सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. ताओंनी कसली ही पर्वा न करता योगावर कायम प्रेम केलं. आणि आज 102 वर्षांनी ताओ पोरचोन लिंच काळाच्या पडद्याआड गेल्या.

First published: February 22, 2020, 10:15 AM IST

ताज्या बातम्या