जाहिरात
मराठी बातम्या / देश / धक्कादायक! कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या भाजप युवा मोर्चा नेत्याचा उपचारादरम्यान मृत्यू

धक्कादायक! कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या भाजप युवा मोर्चा नेत्याचा उपचारादरम्यान मृत्यू

धक्कादायक! कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या भाजप युवा मोर्चा नेत्याचा उपचारादरम्यान मृत्यू

कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी फ्रंटलाइनवर अनेक जण काम करीत आहेत. त्यापैकी अनेकांचा कोरोनाची लागण झाली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

आग्रा, 14 मे : कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) देशभरात बाधितांची संख्या वाढत आहे. जून-जुलैमध्ये हा आकडा कित्येक पटीने जास्त असेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यादरम्यान एक धक्कादायक बाब समोर आली आहे. कोरोनामुळे संक्रमित झालेल्या भाजपच्या युवा मोर्चाच्या नेत्याचा मृत्यू झाला आहे. परमेश राव मराठा असं त्यांचं नाव आहे. गुरुवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर एसएन मेडिकल रुग्णालयात उपचार सुरू होते. तपासणीनंतर ते घरी निघून गेले होते. मात्र नंतर तब्येत बिघडल्याने ते रुग्णालयात गेले. तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोना संसर्गामुळे 26 जणांचा मृत्यू झाला आहे.

News18

भाजप युवा नेत्याच्या मृत्यूनंतर पार्टीचे नेता आणि कार्यकर्त्यांनामध्ये दु:खाचे वातावरण आहे. आग्राचे पूर्व महानगर अध्यक्ष विजय शिवहरे यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करीत शोक व्यक्त केला आणि परमेश यांना श्रद्धांजली अर्पण केली. दुसरीकडे कोरोनापासून बचाव करण्यासाठी भारताकडून प्रयत्न केले जात आहेत. कोरोनाव्हायरसमुळे (Coronavirus) आतापर्यंत लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र आतापर्यंत कोणत्याही देशाला कोरोनावर लस किंवा ठोस उपाय शोधता आलेले नाही. जवळजवळ 100हून अधिक देश लस शोधण्यासाठी दिवसरात्र मेहनत करत आहेत. याशिवाय औषधांवरही युद्धपातळीवर काम सुरू आहे. मात्र कोणालाही यश आलेलं नाही. या सगळ्यात जागतिक आरोग्य संघटनाने (WHO) काही औषधांचे ट्रायल (तपासणी) करण्यास सुरुवात केली आहे. यातून हे औषध कितपत उपयोगी आहे, हे सिध्द केले जाणार आहे. इंग्रजी वृत्तपत्र  हिंदूस्थान टाइम्सनं  दिलेल्या वृत्तानुसार, WHOच्या या ट्रायलमध्ये 1500 भारतीय कोरोना रुग्ण सामिल होणार आहेत. यामध्ये जगभरातील 100 देशांच्या रुग्णांचा समावेश आहे. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनं (ICMR) ट्रायलसाठी रुग्णांची निवड करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत देशातील 9 रुग्णालयांची निवड करण्यात आली आहे. संबंधित - जन्मलेल्या लेकराला 52 दिवस झाले तरी पाहू शकला नाही पोलीस बाप कोरोनाग्रस्तांसाठी विशेष आहार; Healthy diet ने रुग्ण करत आहेत व्हायरसवर मात

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP
  • First Published :
जाहिरात
जाहिरात