मराठी बातम्या /बातम्या /देश /महिलांसाठी 24 तास काम करणार ही राष्ट्रीय हेल्पलाईन, या क्रमांकावर नोंदवता येणार तक्रार

महिलांसाठी 24 तास काम करणार ही राष्ट्रीय हेल्पलाईन, या क्रमांकावर नोंदवता येणार तक्रार

महिलांना सुरक्षितता पुरवणं हा या हेल्पलाइनचा मुख्य उद्देश असून मंत्रालयाने राष्ट्रीय महिला आयोगाच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम सुरू केला आहे. अत्याचाराने पीडित महिलांना पोलीस, हॉस्पिटल, मनोविकारतज्ज्ञ अशा सगळ्या सेवा एका छताखाली उपलब्ध व्हाव्यात ही हेल्पलाईन सुरू करण्यामागची भूमिका आहे.

महिलांना सुरक्षितता पुरवणं हा या हेल्पलाइनचा मुख्य उद्देश असून मंत्रालयाने राष्ट्रीय महिला आयोगाच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम सुरू केला आहे. अत्याचाराने पीडित महिलांना पोलीस, हॉस्पिटल, मनोविकारतज्ज्ञ अशा सगळ्या सेवा एका छताखाली उपलब्ध व्हाव्यात ही हेल्पलाईन सुरू करण्यामागची भूमिका आहे.

महिलांना सुरक्षितता पुरवणं हा या हेल्पलाइनचा मुख्य उद्देश असून मंत्रालयाने राष्ट्रीय महिला आयोगाच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम सुरू केला आहे. अत्याचाराने पीडित महिलांना पोलीस, हॉस्पिटल, मनोविकारतज्ज्ञ अशा सगळ्या सेवा एका छताखाली उपलब्ध व्हाव्यात ही हेल्पलाईन सुरू करण्यामागची भूमिका आहे.

पुढे वाचा ...

  नवी दिल्ली, 29 जुलै: महिलांवरील अत्याचाराची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. अनेकदा नवराच किंवा घरातील सासरची मंडळीच तिचा छळ करत असतात पण समाजाच्या भीतीने ती गप्प बसते. पोलिसांनी कितीही प्रयत्न केले तरीही महिला कुटुंबियांविरुद्ध बोलायला तयार होत नाहीत. केवळ सासरचा छळ असंच नाही तर ऑफिसातही अनेक महिलांचा वरिष्ठांकडून किंवा सहकाऱ्यांकडून छळ केला जातो. पण आता महिलांवर होणाऱ्या अत्याचार, त्रास याची माहिती त्या राष्ट्रीय हेल्पलाईनच्या माध्यमातून देऊ शकणार आहेत.

  केंद्रीय महिला व कुटुंब कल्याण मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते 27 जुलै 2021 रोजी महिलासांठी 24 तास 7 दिवस सुरू असणाऱ्या राष्ट्रीय हेल्पलाईनचं उद्घाटन करण्यात आलं. महिलांवर होणाऱ्या अत्याचारांबद्दल महिलांना दिवस-रात्र माहिती देण्याची सेवा उपलब्ध व्हावी, त्याचबरोबर अगदीच आपत्ती आलेली नसतानाही महिलांना त्यांच्या तक्रारी मांडता याव्यात हा या हेल्पलाईनचा उद्देश आहे.

  त्याचबरोबर महिलांना गरज असल्यास हेल्पलाईनमधील तज्ज्ञ सल्लाही देतील. ही हेल्पलाइन पोलीस, हॉस्पिटल्स, जिल्हा सेवा प्राधिकरण, मानसशास्रज्ञ यांच्याशी जोडण्यात येणार आहे. तसंच याच हेल्पलाइन क्रमांकाच्या माध्यमातून महिलांना सरकारी योजनांची माहितीही दिली जाणार आहे.

  महिलांना सुरक्षितता पुरवणं हा या हेल्पलाइनचा मुख्य उद्देश असून मंत्रालयाने राष्ट्रीय महिला आयोगाच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम सुरू केला आहे. अत्याचाराने पीडित महिलांना पोलीस, हॉस्पिटल, मनोविकारतज्ज्ञ अशा सगळ्या सेवा एका छताखाली उपलब्ध व्हाव्यात ही हेल्पलाईन सुरू करण्यामागची भूमिका आहे. त्यामुळे ही हेल्पलाईन 24 तास सुरू राहील.

  देशातील कोणतीही महिला आपल्यावर होणाऱ्या अत्याचारांबद्दल हेल्पलाईन क्रमांक 7827 170 170 वर फोन करून आपली तक्रार नोंदवू शकते. ही हेल्पलाईन 24 तास सुरू असेल. या हेल्पलाईनच्या माध्यमातून महिलांना वेळेवर माहिती आणि मदत पुरवली जाईल, असं राष्ट्रीय महिला आयोगाने केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

  मीराबाई चानूच्या राज्यात आहे आशियातील असं मोठं मार्केट, ज्याठिकाणी आहे महिलाराज

  राष्ट्रीय महिला आयोगाच्या परिसरातून ही हेल्पलाईन चालवली जाणार असून तिला प्रशिक्षित विशेषज्ज्ञ मदत करणार आहेत. सल्ला देणार आहेत. 18 वर्षांची किंवा त्याहून जास्त वयाची तरुणी किंवा महिला या हेल्पलाईनला फोन करून सेवा घेऊ शकते. राष्ट्रीय महिला आयोग देशभरातून आलेल्या महिलांवरील हिंसाचाराच्या घटनांमध्ये पीडितांना मदत करत आहे.

  यहाँ के हम सिकन्दर! पंतप्रधान नरेंद्र मोदींची जादू कायम

  वेबसाईटवरही करता येईल तक्रार -

  राष्ट्रीय महिला आयोगाच्या www.ncw.nic.in या वेबसाईटच्या माध्यातूनही महिला आपल्या तक्रारी नोंदवू शकतात. लिखित स्वरूपात आपल्यावर होणाऱ्या अत्याचारांची माहिती महिला देऊ शकतात. राष्ट्रीय महिला आयोगाकडे आलेल्या तक्रारींची दखल घेऊन आयोग त्यावर तातडीने कारवाई करतो आणि समस्येचं निराकरण करण्याचा प्रयत्न करतो. तक्रार नोंदवण्याच्या सुविधेची व्याप्ती वाढवण्यासाठी आयोगाने ही हेल्पलाईन सुरू केली आहे. डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन आणि इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने ही हेल्पलाइन विकसित केली आहे.

  First published:
  top videos

   Tags: Women, Women safety, Women security