मराठी बातम्या /बातम्या /देश /पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरले सर्वात 'लोकप्रिय नेता', Twitter वर फॉलोअर्सची संख्या 7 कोटींच्या पार

पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरले सर्वात 'लोकप्रिय नेता', Twitter वर फॉलोअर्सची संख्या 7 कोटींच्या पार

PM Narendra Modi Twitter Follower:  नरेंद्र मोदी हे जगातील सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्या नेत्यांपैकी एक आहेत.

PM Narendra Modi Twitter Follower: नरेंद्र मोदी हे जगातील सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्या नेत्यांपैकी एक आहेत.

PM Narendra Modi Twitter Follower: नरेंद्र मोदी हे जगातील सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्या नेत्यांपैकी एक आहेत.

नवी दिल्ली, 29 जुलै: पंतप्रधान (India Prime Minister) नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची लोकप्रियता मायक्रोब्लॉगिंग साईट ट्वीटरवर (Twitter)सतत वाढत चालली आहे. महत्त्वाचं म्हणजे सोशल मीडियावर फॉलो केलेल्या भारतीय नेत्यांच्या यादीत पंतप्रधान मोदी पहिल्या क्रमांकावर आहेत. मोदींच्या ट्विटर हँडलवर फॉलोअर्सची संख्या 70 मिलियन म्हणजेच 70 कोटींहून अधिक आहे. नरेंद्र मोदी हे जगातील सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्या नेत्यांपैकी एक आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकप्रिय नेत्यांच्या यादीत अव्वल

यासोबतच पीएम मोदी (PM Modi)जगातील सक्रिय नेत्यांच्या यादीत सर्वात लोकप्रिय नेते ठरले आहेत. याआधी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अव्वल होते. ट्रम्प यांना 88.7 मिलियन म्हणजेच 8.87 कोटी लोकांनी फॉलो केलं होतं. मात्र त्यांचं अकाऊंट आता बंद झालं आहे.

डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump)यांच्या पर्सनल अकाऊंटला 88.7 मिलियन म्हणजेच 8 कोटी 87 लाख लोक फॉलो करत होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सक्रिय नेत्यांच्या यादीत दुसर्‍या क्रमांकावर होते. नरेंद्र मोदींना 64.7 मिलियन म्हणजेच 6 कोटी 47 लाख लोक फॉलो करत होते. आता फॉलोअर्सची ही संख्या वाढून 70 मिलियन म्हणजे 7 कोटी झाली आहे.

पीव्ही सिंधू टोकियो ऑलिम्पिकमध्ये उपांत्यपूर्व फेरीत, सलग तिसरा विजय

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी 2009 ला ट्विटर (Twitter) वापरण्यास सुरुवात केली. त्यानंतर ते सतत अॅक्टिव्ह असतात. त्यावेळी ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. 2010 मध्ये त्यांचे एक लाख फॉलोअर्स झाले होते. तर नोव्हेंबर 2011 मध्ये त्यांच्या फॉलोअर्सची संख्या चार लाखांवर गेली. याआधी 2020 साली पंतप्रधान मोदी ऑगस्ट ते ऑक्टोबर दरम्यान ट्विटर, यूट्यूब, गूगल सर्चवर ट्रेडिंग चार्टमध्ये अव्वल होते.

राहुल गांधी यांचे 19.4 मिलियन फॉलोअर्स

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi)यांचे ट्विटरवर 19.4 मिलियन फॉलोअर्स आहेत. राहुल गांधी यांच्यापेक्षा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah)यांचे फॉलोअर्स जास्त आहे. त्यांचे ट्विटरवर 26.2 मिलियन फॉलोअर्स आहेत. याव्यतिरिक्त दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे ट्विटर 22.8 मिलियन फॉलोअर्स आहेत.

First published:
top videos

    Tags: Narendra modi, Pm narendra mdi, Twitter account