Love Jihad कायद्याअंतर्गत छळ करत दिलं 'गर्भपाताचं इंजेक्शन'; महिलेचे खळबळजनक आरोप

योगी सरकारने (Yogi government) कथित लव जिहाद (Love Jihad) रोखण्यासाठी कायदा आणल्यानंतर अनेक जोडप्यांवर पोलीस कारवाई करत आहेत. त्यातल्या एका तरुणीने पतीचा आणि आपला अधिकाऱ्यांनी छळ केल्याचा आरोप केला आहे.

योगी सरकारने (Yogi government) कथित लव जिहाद (Love Jihad) रोखण्यासाठी कायदा आणल्यानंतर अनेक जोडप्यांवर पोलीस कारवाई करत आहेत. त्यातल्या एका तरुणीने पतीचा आणि आपला अधिकाऱ्यांनी छळ केल्याचा आरोप केला आहे.

  • Share this:
    मुरादाबाद (उत्तर प्रदेश), 15 डिसेंबर : योगी सरकारने (Yogi Aadityanath) उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) 'लव जिहाद'ला (Love Jihad) रोखणारा कायदा आणल्यानंतर अनेक जोडप्यांची धरपकड सुरू आहे. पोलिसांसह बजरंग दलाचे (Bajrang Dal) कार्यकर्तेही अधिक सक्रिय झाल्याचे चित्र आहे. अशाच एका प्रकरणात दहा दिवसांपूर्वी पिंकी या 22 वर्षीय गर्भवती महिलेच्या पती आणि दिराला अटक करण्यात आली. पिंकीने कोर्टात संबंधित सरकारी अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. पण उत्तर प्रदेश प्रशासनाने हे आरोप फेटाळून लावत गर्भपात झाल्याचं ती खोटं सांगत असल्याचं स्पष्ट केलं आहे. नोव्हेंबरमध्ये उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ सरकारने कथित लव्ह जिहाद रोखण्यासाठी कायदा आणला.  त्याअंतर्गत आता काही जोडप्यांची धरपकड सुरू आहे. पिंकी आणि तिच्या नवऱ्यालाही या प्रकरणी पोलिसांच्या कारवाईला तोंड द्यावं लागलं. पिंकीची रवानगी पोलिसांनी मुरादाबादच्या नारी निकेतनमध्ये केली. सोमवारी न्यायाधीशांसमोर बोलताना पिंकीने संस्थेमधील संबंधित अधिकाऱ्यांवर छळासह जबरदस्तीनं इंजक्शन दिलं. त्यानंतर आपल्याला खूप ब्लीडिंग झालं आणि गर्भपाताचा धोका निर्माण झाला, असे आरोप केले. पतीला अटक केल्यानंतर पिंकीला नारी निकेतनमध्ये ठेवण्यात आलं होतं. कोर्टापुढे बोलताना पिंकी म्हणाली, 'माझा नारी निकेतनमध्ये खूप छळ केला गेला. त्यामुळे पोटात दुखायला लागलं. तरीही सुरवातीला दुर्लक्ष केलं गेलं. नंतर त्रास वाढल्यावर अधिकाऱ्यांनी डॉक्टरांकडे नेलं मात्र तिथे दिल्या गेलेल्या इंजेक्शन्समुळं माझा गर्भपात झाला. प्रचंड रक्तस्रावाचा त्रास होऊ लागला.' पिंकीने पत्रकारांंपुढे बोलतना सांगितलं की, आपण सज्ञान असून जुलैमध्ये स्वतःच्या मर्जीने लग्न केलं होतं.पती आणि दिराला लवकरात लवकर मुक्त करण्याचे आदेश देण्याबाबत तिनं कोर्टाला विनंती केली. कोर्टाने या महिलेला सासरी पाठवण्याचे आदेश देत पोलिसांना फटकारलं आहे. पिंकीच्या म्हणण्यानुसार, 6 डिसेंबरला ती आणि तिचा पती रशीद आपल्या लग्नाची नोंदणी करणार होते मात्र त्याआधीच बजरंग दलाच्या लोकांनी तिला जबरदस्तीने पोलिसांच्या ताब्यात दिलं. तिच्या पतीसह दिरावरही बळेच धर्मांतर करवल्याचा गुन्हा दाखल करायला लावला. पोलिसांनी गुन्हा दाखल करत दोघांनाही गजाआड केलं. दोघांकडेही विवाहाचा कुठलाच पुरावा नसून या महिलेच्या आईनं आमच्याकडे तक्रार केल्याचं पोलीस म्हणाले. गर्भपात झाल्याची अफवा उत्तर प्रदेशचे बालहक्क संरक्षण अधिकारी विशेष गुप्ता यांनी मात्र गर्भपात झाल्याची बाब फेटाळून लावत महिलेचा गर्भ सुरक्षित असल्याचं सांगितलं. ते म्हणाले, 'तब्येत बरी नसल्यानं या महिलेला संस्थेमधून जिल्हा महिला न्यायायात नेण्यात आलं होतं. गर्भपात झाल्याची बाब अफवा आहे.' दरम्यान काही काळापूर्वी अलाहाबाद उच्च न्यायालयानं एक महत्त्वाचा निकाल दिला. त्यात म्हटलंय, 'कोणत्याही दोन व्यक्तींच्या नात्याला हिंदू आणि मुस्लिम या रूपात बघता येणार नाही. कुणीही आपल्या पसंतीनं जीवनसाथी निवडल्यावर त्यात कुटुंब, तिऱ्हाईत व्यक्ती किंवा सरकारला आक्षेप किंवा विरोधाचा अधिकार नाही. जर राज्य किंवा कुणी व्यक्ती असं करत असेल, तर ते व्यक्तिगत अधिकाराचं उल्लंघन आहे
    Published by:News18 Desk
    First published: