इंदौर, 19 एप्रिल : कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. सुरुवातीला 14 एप्रिलपर्यंत केलेलं लॉकडाऊन केंद्राने 3 मेपर्यंत वाढवलं. दरम्यान, लोकांना अत्यावश्यक सेवा मिळाव्यात यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. तरीही कोरोनाशी लढताना काही ठिकाणी नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. असाच एक प्रकार डॉक्टर महिलेसोबत घडला. पतीमध्ये कोरोनाची लक्षण दिसल्यानंतर डॉक्टर पत्नी त्याला घेऊन चार रुग्णालयांमध्ये गेली. मात्र त्याला दाखल करून घेण्यास नकार देण्यात आला. अखेर पत्नीने घरीच त्याच्यावर उपचार सुरू केले.
पतीची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली तोपर्यंत घरीच उपचार करून तो ठीकही झाला होता. मात्र पुन्हा त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्यांच्यावर अरबिंदो रुग्णालयात उपचार सुरू असून दुसरा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. नयापुरा इथं राहणाऱ्या अमन सय्यद यांची तब्येत 28 मार्चला बिघडली होती. तेव्हा त्यांच्यात कोरोना लक्षणे दिसल्यानं डॉक्टर असलेल्या पत्नीने त्यांना घेऊन रुग्णालय गाठलं. मात्र तो साधा ताप असल्याचं सांगत परत पाठवण्यात आलं. त्यानंतर पत्नी इतर दोन रुग्णालयात गेली. तिथंही पहिल्यासारखाच अनुभव आला.
हे वाचा : गर्भवती 7 किमी चालली, वाटेत असलेल्या क्लिनिकमध्ये डेन्टिस्टने केली प्रसूती
एमवाय रुग्णालयातही त्यांना दोन तास बसवून ठेवण्यात आलं. त्यानंतर विनाचौकशी परत पाठवण्यात आलं. एमटीएचचे रिपोर्ट येण्याआधी अमन सय्यद बरे झाले होते. डॉ. नानजीन यांनी सांगितल्यानुसार तीन रुग्णालयांनी अमन यांना दाखल करुन घेण्यास नकार दिला. त्यानंतर पतीला घेऊन त्या घरी आल्या आणि तिथंच उपचार सुरू केले. 31 मार्चला एमचीएच रुग्णालयात त्यांची कोरोनाची तपासणी करण्यात आली. त्यानंतर रिपोर्ट य़ेईपर्यंत घरी पाठवलं होतं.
हे वाचा : आनंदाची बातमी! गोवाही झालं कोरोनामुक्त, 3 एप्रिलनंतर एकही रुग्ण नाही
दरम्यान, पतीला कोरोना झाल्याची शंका डॉक्टर पत्नीला आली होती. त्यामुळे पत्नीने घरालाच आयसोलेशन सेंटर केलं होतं. तिथंच ते बरे झाले. सहा दिवसांनी तपासणीचे रिपोर्ट आले त्यात पॉझिटिव्ह असल्याचं समजलं. नानजीन यांनी सांगितलं की, मला पहिल्यापासून माहिती होतं त्यामुळं टेन्शन घेतलं नाही. रिपोर्ट पॉझिटिव्ह येताच प्रशासनाला माहिती दिली आणि त्यांना अरबिंदो रुग्णालयात दाखल केलं. तोपर्यंत त्यांच्यात कोरोनाची लक्षणं उरली नव्हती. शेवटी 17 एप्रिलला करण्यात आलेला रिपोर्ट निगेटिव्ह आला.|
हे वाचा : चीनने पसरवला का कोरोना? अमेरिकेच्या दाव्यावर वुहानच्या लॅबनं दिलं उत्तर
संपादन - सूरज यादव