• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • मन सुन्न करणारी घटना; 4 दिवस सडत होता महिलेचा मृतदेह, उंदीर अन् मुंग्यांनी खाल्ला

मन सुन्न करणारी घटना; 4 दिवस सडत होता महिलेचा मृतदेह, उंदीर अन् मुंग्यांनी खाल्ला

आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे एका महिलेचा मृतदेह (Dead Body of Woman) चार दिवसांपासून शवविच्छेदनगृहातच (Mortuary) पडून होता. हा मृतदेह अक्षरशः सडला होता, याशिवाय उंदीर आणि मुंग्यांनी मृतदेहाचा बहुतेक भाग खाल्ला होता.

 • Share this:
  लखनऊ 06 मे: देशभरात कोरोनानं अक्षरशः थैमान घातलं आहे. या परिस्थितीमध्ये आरोग्य सुविधांचा मोठा तुटवडा जाणवत आहे. दरम्यान अनेकदा रुग्णालय आणि डॉक्टरांच्या हलगर्जीपणाबाबतची वृत्तंही समोर येत आहेत. असंच आणखी एक मन सुन्न करणारं प्रकरण समोर आलं आहे. या घटनेमध्ये आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे एका महिलेचा मृतदेह (Dead Body of Woman) चार दिवसांपासून शवविच्छेदनगृहातच (Mortuary) पडून होता. हा मृतदेह अक्षरशः सडला होता, याशिवाय उंदीर आणि मुंग्यांनी मृतदेहाचा बहुतेक भाग खाल्ला होता. ही घटना उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) आजमगडमधील (Azamgarh) आहे. हा मृतदेह सडल्यामुळे सगळीकडे दुर्गंध पसरला होता. त्यामुळे, घटनेचा खुलासा झाला. चार दिवस हा मृतदेह शवविच्छेदनगृहात होता, मृतदेहाला मुंग्या आणि उंदीर खात राहिले. मात्र, तरीही या गोष्टीची कोणालाच काहीही कल्पना कशी नव्हती, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. लोकांनी रुग्णालयाच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. सदर रुग्णालयाच्या म्हणण्यानुसार, 29 एप्रिलला संध्याकाळी बिलरियागंजमध्ये रस्त्यावर एक महिला गंभीर जखमी अवस्थेत आढळली होती. 32 वर्षीय अज्ञात महिलेला रुग्णवाहिकेच्या कर्मचाऱ्यांनी संध्याकाळी पाच वाजता रुग्णालयात दाखल केलं. मात्र, दुसऱ्याच दिवशी 30 एप्रिलला सकाळी महिलेचा मृत्यू झाला. यानंतर कर्मचाऱ्यांनी महिलेचा मृतदेह शवविच्छेदनगृहात ठेवला. सोबतच पोलिसांनाही शवविच्छेदन प्रक्रियेसाठी याबाबतची माहिती दिली. याप्रकरणी बोलताना आजमगडचे सीएमओ म्हणाले, की तीन दिवसांपूर्वी एका अज्ञात महिलेचा मृतदेह शवविच्छेदनगृहात ठेवण्यात आला होता. 72 तास निरीक्षणामध्ये ठेवल्यानंतर आज हे पोस्टमॉर्टम केले जात आहे, असं त्यांनी सांगितलं. राज्यात कोरोनाचा प्रसार प्रचंड वाढत आहे. मागील चोवीस तासात राज्यात कोरोनाचे नवे 31,165 रुग्ण आढळले आहेत. तर, 357 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यानंतर उत्तर प्रदेशातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 2,62,474 वर पोहोचली आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published: