नवी दिल्ली, 31 ऑगस्ट : गर्लफ्रेंड (Girlfriend) दुर्लक्ष (avoid) करत असल्याने तिची हत्या (Murder) करून प्रियकर (Lover) पोलिसांना सरेंडर (Surrender) झाल्याची घटना उघडकीला आली आहे. अगोदर मैत्री, मग प्रेमसंबंध आणि त्यानंतर रजिस्टर लग्न होऊनही गर्लफ्रेंड दुसऱ्या तरुणासोबत संबंध ठेवत असल्याच्या संशयावरून प्रियकराने तिची हत्या केली. दिल्लीतील संगम विहार परिसरात राहणारी 22 वर्षांची राबिया ही दिल्ली सरकारच्या सिव्हिल डिफेन्स विभागात काम करत होती. याच विभागात काम करणाऱ्या निजामुद्दीनशी तिची ओळख झाली होती. 25 वर्षीय निजामुद्दीनने तिला मदत केल्यामुळे त्यांची मैत्री अधिक घट्ट झाली आणि काही काळात मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं होतं. बदलीनंतर बदललं गणित सर्व काही सुरळीत सुरु असतानाच राबियाची बदली झाली कामाचं ठिकाण बदललं. त्यानंतर दोघांचं भेटणं कमी झालं. मात्र त्या काळात आपण एकमेकांशी रजिस्टर पद्धतीनं लग्न केल्याचं निजामुद्दीननं पोलिसांना सांगितलं. हे लग्न झाल्यानंतर दोघांनीही ही गोष्ट आपापल्या घरी कळवली. मात्र राबियाच्या घरच्यांना हे लग्न मान्य नव्हतं. त्यामुळे राबियाने आपल्याला टाळायला सुरुवात केल्याचं निजामुद्दीनने पोलिसांना सांगितले. आपल्याशी संबंध तोडून इतर कुणाशी संबंध प्रस्थापित करण्याच्या तयारीत ती असल्याचा संशय निजामुद्दीनला होता. या संशयातूनच त्याने तिच्या हत्येचा कट आखला. असा केला खून 26 ऑगस्टला निजामुद्दीनने फोन करून लाबियाला लाजपत नगरला बोलावून घेतले. तिथून तिला घेऊन तो सूरज कुंड परिसरात पोहोचला. याच दरम्यान दोघांमध्ये वाद झाले आणि राग अनावर होऊन त्याने चाकूने राबियाची हत्या केली. हत्या करून त्याने तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन स्वतःला सरेंडर केलं. हे वाचा - अमेरिकेच्या माघारीनंतर तालिबानकडून विमानतळावर अंदाधुंद गोळीबार आणि आतषबाजी पोलीस तपास सुरू पोलिसांनी या प्रकऱणी खुनाचा गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. निजामुद्दीनमुळे आपल्या निष्पाप मुलीचा जीव गेला असून त्याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







