भोपाळ 17 जानेवारी : उज्जैनमधील दिल्ली पब्लिक स्कूलच्या (डीपीएस) महिला प्राचार्या रेखा पिल्लई यांचा सोमवारी एका रस्ते अपघातात मृत्यू झाला. 60 वर्षीय पिल्लई स्वत: कार चालवत इंदूरमधील आपल्या घरातून शाळेसाठी निघाल्या होत्या. दरम्यान, धतरावदा गावाजवळ त्यांची कार एका झाडावर आदळली. आसपास असलेल्या लोकांनी जखमी पिल्लई यांना रुग्णालयात नेलं, मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
रक्ताची उलटी झाली आणि गेला जीव; Nepal plane crash नंतर भारतातही विमान प्रवासात भयंकर घडलं
उज्जैन जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक (एसपी) सत्येंद्र शुक्ला यांनीही सांगितलं की, डीपीएस स्कूल उज्जैनच्या मुख्याध्यापिका रेखा पिल्लई या इंदूरहून उज्जैनला जात असताना त्यांची कार एका झाडावर आदळली. यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना घटनास्थळावरून खासगी रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
एसपींनी सांगितलं की, रेखा पिल्लई गेल्या 5 वर्षांपासून उज्जैनच्या डीपीएसमध्ये प्राचार्या म्हणून कार्यरत होत्या. पोलिसांनी पती श्रीधर पिल्लई यांना घटनेची माहिती दिली आहे. मृतदेह जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आला आहे. आता त्यांच्या मुलाच्या येण्याची वाट बघितली जात आहे. महिलेचा मुलगा सिंगापूरमध्ये काम करतो, असं सांगण्यात आलं.
मस्करीत दुचाकीला बांधलं मग अचानक गाडी सुरू केली अन्..; पतीचं गर्भवती पत्नीसोबत राक्षसी कृत्य
महिला मुख्याध्यापिका रेखा पिल्लई यांच्या निधनाने विद्यार्थ्यांपासून शाळेतील कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांनाच धक्का बसला आहे. पिल्लई सहसा ड्रायव्हरसोबत त्यांच्या इंदूर येथील घरातून उज्जैनला येत असे. मात्र सोमवारी त्या स्वत: कार चालवत होत्या. असं सांगण्यात आलं, की सहसा महिला मुख्याध्यापिका शनिवारी ड्रायव्हरशिवाय उज्जैनमधील शाळेत जात असत आणि सोमवारी परत येत असे. या सुट्टीत ड्रायव्हर आपल्या घरीच थांबत असे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Accident, School teacher