Home /News /aurangabad /

Aurangabad : बायकोची मैत्रीण बनली प्रेयसी, मग प्रेमातील अडथळा दूर करण्यासाठी काढला तिच्या पतीचा काटा

Aurangabad : बायकोची मैत्रीण बनली प्रेयसी, मग प्रेमातील अडथळा दूर करण्यासाठी काढला तिच्या पतीचा काटा

Aurangabad Vaijapur Murder मृत अण्णा जाधव त्याच्या पत्नीला दारु पिऊन मारहाण करत होता. तर आरोपी काकासाहेब याचे या महिलेशी प्रेमसंबंध होते. त्यामुळं अण्णासाहेबची हत्या केल्याचं सांगितलं.

    औरंगाबाद, 25 मे : वैजापूर (Vaijapur) तालुक्यात खुलताबाद येथील व्यक्तीच्या मृतदेह पोलिसांना आढळून आला होता. या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना अवघ्या काही तासांत यश आलं. विशेष म्हणजे अनैतिक संबंधांमधून ही हत्या झाल्याचं समोर आलं आहे. (Murder Extra marital affair) मृताच्या पत्नीच्या प्रियकरानं या व्यक्तीची हत्या केल्याचं स्पष्ट झालं आहे. (वाचा-Pune : हत्या झालेल्या 75 वर्षीय वृद्धेवर हत्येपूर्वी आणि नंतरही लैंगिक अत्याचार) औरंगाबादच्या खुलताबाद तालुक्यातील बाजार सांगवी याठिकाणच्या अण्णा जाधव यांचा मृतदेह वैजापूर तालुक्यात गारज इथं आढळला होता. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवल्यानंतर जाधव यांची ओळख पटली. त्यानंतर अधिक खोलवर तपास केल्यानंतर काकासाहेब खुटे यानं अण्णा जाधव यांची हत्या केल्याचं पोलिस तपासात समोर आलं. त्यार आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्यानं या गुन्ह्याची कबुली दिली. मृत अण्णा जाधव त्याच्या पत्नीला दारु पिऊन मारहाण करत होता. तर आरोपी काकासाहेब याचे या महिलेशी प्रेमसंबंध होते. त्यामुळं अण्णासाहेबची हत्या केल्याचं सांगितलं. (वाचा-भावोजीसोबत पत्नीनं केलेल्या त्या कृत्यामुळे पतीला बसला धक्का, उचललं टोकाचं पाऊल) बायकोची मैत्रीण बनली प्रेयसी मृत अण्णा जाधव आणि मारेकरी काकासाहेब खुटे या दोघांच्या पत्नी एकमेकींच्या मैत्रिणी होत्या. अण्णा जाधव यांची पत्नी नंदा हिचं आरोपी काकासाहेबच्या पत्नीकडं कायम येणं जाणं होतं. त्यातून नंदा आणि काकासाहेब यांचे प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यानंतर नंदानं काकासाहेबला तिचा पती दारु पिऊन मारहाण करत असल्याचं सांगितलं. वारंवारच्या तक्रारी नंदा करत होती. नंदानं काकासाहेबला तिच्या पतीचा बंदोबस्त करून टाक असंच थेट सांगितलं होतं. नंदाचा पती प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्यानं काकासाहेबनही तिला हो असं सांगितलं. या सर्वानंतर काकासाहेबनं कट रचला. अण्णा जाधव याला पाहुण्यांकडं जायचं सांगून तो त्याला घेऊन निघाला. नंतर त्याला गारज इथं बंद असलेल्या शुगर मिल परिसरात नेऊन त्याची हत्या केली. दगडाने मारहाण आणि नंतर पट्ट्याने गळा आवळून त्याची हत्या केली. त्यानंतर मृताची पत्नी नंदा जाधव हिनंही गुन्ह्याची कबुली दिली. अनैतिक प्रेमसंबंधातून झालेल्या या हत्येचा छडा पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्ये लावला.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Aurangabad News, Crime news

    पुढील बातम्या