मराठी बातम्या /बातम्या /देश /

जगाचा निरोप घेण्याआधी महिलेनं केलं भलं काम, चार जणांना दिलं जीवदान

जगाचा निरोप घेण्याआधी महिलेनं केलं भलं काम, चार जणांना दिलं जीवदान

Corona नंतर या आजाराची वाढली भिती

Corona नंतर या आजाराची वाढली भिती

महिलेचा स्वतःचा जीव गेला मात्र जाताजाता तिनं एक भलं काम केलं आणि चार लोकांचा जीव तिच्यामुळे वाचला. या महिलेनं अवयव दान केल्यानं चार लोकांचा जीव वाचला (Woman Gifts Life to 4 Patients) आहे

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 29 मे : देशाची राजधानी दिल्लीतील (Delhi) एक महिला चार लोकांसाठी देवदूतच ठरली आहे. महिलेचा स्वतःचा जीव गेला मात्र जाता जाता तिनं एक भलं काम केलं आणि चार लोकांचा जीव तिच्यामुळे वाचला. या महिलेनं अवयव दान केल्यानं चार लोकांचा जीव वाचला (Woman Gifts Life to 4 Patients) आहे. हे प्रकरण दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयातील आहे. इथे एका ४३ वर्षीय महिलेनं आपले अवयव दान केले आहेत.

VIDEO: पळण्याच्या प्रयत्नात असलेल्या महिला आरोपीचा थरारक व्हिडिओ

ही महिला हायपरटेंसिव (Hypertensive) होती. अचानक तिला उलटी झाली आणि यानंतर प्रचंड डोकेदुखी होऊ लागली. यानंतर संबंधित महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. महिलेची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली. 20 मे रोजी महिलेला सर गंगाराम रुग्णालयातील आपात्कालीन वार्डात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, महिलेची प्रकृती सातत्यानं खालवत होती. टेस्टमध्ये असं समोर आलं, की या महिलेला ब्रेन हेमरेजचा (Brain Haemorrhage) त्रास आहे. यानंतर डॉक्टरांच्या टीमनं महिलेचा जीव वाचवण्यासाठी अनेक प्रयत्न केले. मात्र, या प्रयत्नांना यश आलं नाही आणि डॉक्टरांनी या महिलेचा ब्रेन डेड झाल्याचं सांगितलं.

'या' 4 राशीचे लोक देतात धोका, स्वार्थासाठी कोणत्याही थराला जाण्यास असतात तयार

ही बातमी ऐकताच महिलेच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. ही महिला सात भावांमध्ये एकच बहिण होती. तर, महिलेला एक 21 वर्षाचा मुलगाही आहे. यानंतर रुग्णालयात महिलेच्या कुटुंबीयांना समजावून सांगण्यात आलं आणि अवयव दान करण्यासाठी त्यांना तयार करण्यात आलं. त्यांना असं सांगण्यात आलं, की असं करुन ते या महिलेच्या आठवणी जिवंत ठेवू शकतात. यानंतर महिलेचे कुटुंबीय अवयव दान करण्यासाठी तयार झाले आणि या महिलेनं जगाचा निरोग घेता घेता चार जणांना जीवदान दिलं.

First published:

Tags: Organ donation, Positive story