मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /'या' 4 राशीचे लोक कधीही देतात धोका, स्वतःच्या स्वार्थासाठी कोणत्याही थराला जाण्यास असतात तयार

'या' 4 राशीचे लोक कधीही देतात धोका, स्वतःच्या स्वार्थासाठी कोणत्याही थराला जाण्यास असतात तयार

मिथुन, कर्क, सिंह आणि तूळ या चार राशींच्या व्यक्ती स्वार्थी आणि घाबरट असण्याचं प्रमाण अधिक असतं. या चार राशींच्या व्यक्तींमध्ये योग्य पद्धतीने कार्य करण्याच्या गुणाचा अभाव असू शकतो.

मिथुन, कर्क, सिंह आणि तूळ या चार राशींच्या व्यक्ती स्वार्थी आणि घाबरट असण्याचं प्रमाण अधिक असतं. या चार राशींच्या व्यक्तींमध्ये योग्य पद्धतीने कार्य करण्याच्या गुणाचा अभाव असू शकतो.

मिथुन, कर्क, सिंह आणि तूळ या चार राशींच्या व्यक्ती स्वार्थी आणि घाबरट असण्याचं प्रमाण अधिक असतं. या चार राशींच्या व्यक्तींमध्ये योग्य पद्धतीने कार्य करण्याच्या गुणाचा अभाव असू शकतो.

मुंबई 29 मे : माणसं वेगवेगळ्या स्वभावाची असतात, त्यांची वैशिष्ट्यं वेगवेगळी असतात, त्यांची विचार करण्याची पद्धत वेगवेगळी असते. तरीही त्यातल्या त्यात व्यक्तिमत्त्वातल्या मूळ गुणधर्मांमध्ये साधर्म्य असणाऱ्या अनेक व्यक्ती असतात. 12 राशींमध्ये त्यांची ढोबळ विभागणी केली जाते. मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनू, मकर, कुंभ आणि मीन या त्या 12 राशी आहेत, हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे.

प्रत्येक राशीतल्या माणसांची काही स्वभाव वैशिष्ट्यं असतात. त्यातली काही वैशिष्ट्यं उघडपणे दिसून येतात, तर काही वैशिष्ट्यं फक्त त्या व्यक्तीला अगदी जवळून ओळखणाऱ्यांच्याच लक्षात येतात. काही गोष्टी तर खुद्द त्या व्यक्तींच्याही नकळत व्यक्त होतात. ज्योतिष शास्त्रात या साऱ्या राशींच्या (Zodiac Signs) व्यक्तींच्या स्वभाव वैशिष्ट्यांची माहिती दिलेली असते. किंबहुना या वैशिष्ट्यांच्याच आधारे ज्योतिष शास्त्राने 12 राशींमध्ये माणसांची वर्गवारी केली आहे.

मिथुन, कर्क, सिंह आणि तूळ या चार राशींच्या व्यक्ती स्वार्थी आणि घाबरटअसण्याचं प्रमाण अधिक असतं. 'टीव्ही नाइन हिंदी'ने याबद्दलची माहिती प्रसिद्ध केली आहे. या चार राशींच्या व्यक्तींमध्ये योग्य पद्धतीने कार्य करण्याच्या गुणाचा अभाव असू शकतो. स्वार्थी म्हणजे आपला स्वार्थ साधून घेण्यात पटाईत असणं. धोका देण्याची वृत्ती, मग तो आपला साथीदार का असेना, या राशींच्या व्यक्तींमध्ये असू शकते. आपण कुठे आहोत, याची योग्य माहिती न देणं, आपण काय करतोय याची ताकास तूर लागू न देणं असे गुणधर्म या राशींच्या व्यक्तींमध्ये आढळतात. त्यापैकी काही गोष्टी पाहू या.

मिथुन (Gemini) : कोणाच्या तरी गुड बुक्समध्ये राहण्याचा प्रयत्न या राशीच्या व्यक्ती नेहमी करतात. त्यामुळे सत्याचा विपर्यास करून सांगतात. पाखंडी व्यक्तिमत्त्वं या राशीमध्ये पाहायला मिळू शकतात.  तसंच, कोणतीही बला अंगाशी यायला नको म्हणून आपण निर्दोष असल्याचा देखावा करत राहतात.

कर्क (Cancer) : कर्क राशीचे लोक दयाळू आणि शुद्ध अंतःकरणाचे असतात; पण ही व्यक्तिमत्त्वं आपल्या प्रतिष्ठेचा उपयोग आपल्या फायद्यासाठी करतात. लोकांवर उपकार करून त्यांचा वापर करून घेतात. आपण केलेल्या उपकारांची परतफेड करण्याच्या नावाखाली ते लोकांकडून कामं करून घेतात.

सिंह (Leo) : सिंह राशीचे लोक इतरांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्याचा प्रयत्न नेहमी करत असतात. चांगली असो किंवा वाईट, प्रसिद्धी ती प्रसिद्धी हे तत्त्व या व्यक्तिमत्त्वांमध्ये पाहायला मिळते. कारण चर्चेत राहण्यासाठी या राशीच्या व्यक्ती यापैकी काहीही करू शकतात. लोकांच्या भावनांशी खेळू शकतात. कोणाचं लक्ष वेधून घेण्यासाठी कोणाला जखमी करण्यासही ते मागे-पुढे पाहत नाहीत.

तूळ (Libra) : सगळं काही योग्यच झालं पाहिजे, यावर तूळ राशीच्या व्यक्तींचा भर असतो. जर गोष्टी आपल्या पद्धतीने झाल्या नाहीत, तर लोकांशी छेडछाड करणं, गोष्टी आपल्या बाजूने वळवून घेणं यासाठी या राशीच्या व्यक्ती कोणत्याही थराला जाऊ शकतात.

First published:
top videos

    Tags: Astrology and horoscope, Zodiac signs