नवी दिल्ली, 14 मे: अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Amravati MP Navneet Rana) यांनी दिल्लीतील कॅनॉट प्लेस (Connaught Place) येथील हनुमान मंदिरात (Hanuman Temple) हनुमान चालिसाचे (Hanuman Chalisa) पठण केले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे पती आणि महाराष्ट्राचे आमदार रवी राणाही (Maharashtra MLA Ravi Rana) उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी आरती केली आहे.
राणा दाम्पत्याने यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, राणा दाम्पत्य कोणाच्याही रिमोट कंट्रोलने चालणाऱ्यांपैकी नाही. भाजपच्या ही नाही. ते पुढे म्हणाले की, आज आपण महाराष्ट्रातील जनतेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपासून मुक्त करण्यासाठी हनुमान चालीसाचे पठण करत आहोत. मी तुरुंगात असताना दररोज 101 वेळा हनुमान चालिसाचा पाठ करायची. कोणत्याही निर्दोषाने तुरुंगात जावे असे मला वाटत नाही.
नवनीत राणांचं उद्धव ठाकरेंना पुन्हा आव्हान
खासदार नवनीत राणा यांनी म्हटलं, आजच्या शिवसेनेच्या सभेचा टिझर पाहिला. त्यात उद्धव ठाकरे म्हणतात तुम्ही मला वज्रमूठ द्या, दात पाडण्याचं काम मी करतो. जर इतकी ताकद आहे तर औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहणाऱ्यांचे दात आधी तोडून दाखवा तर तुम्हाला मानेल. असं म्हणत नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आव्हान दिलं आहे. दिल्लीतील कनॉट प्लेस येथील हनुमान मंदिरात हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) पठण करण्यापूर्वी प्रसारमाध्यमांसोबत बोलताना नवनीत राणा यांनी हे विधान केलं आहे.
#WATCH | Amravati MP Navneet Rana recites Hanuman Chalisa at Hanuman Temple, CP in Delhi. Her husband & Maharashtra MLA Ravi Rana also present with her. They were arrested in April and later released on bail over the row to recite Hanuman Chalisa outside Maharashtra CM's house. pic.twitter.com/9yQZHkqlMt
— ANI (@ANI) May 14, 2022
नवनीत राणा यांनी पुढे म्हटलं, उद्धव ठाकरेंच्या माध्यमातून महाराष्ट्रावर संकट आलेलं आहे. हे संकट दूर करण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी मी प्रयत्न करत राहणार आहे. ज्या-ज्या ठिकाणी हनुमान चालीसा मला बोलता येईल त्या ठिकाणी मी बोलणार. मला बंद करण्यासाठी 14 दिवस कमी पडतील. दिल्लीतील हे एक प्राचीन मंदिर आहे आणि त्यामुळे आम्ही येथे महाआरती करत आहोत.
23 एप्रिलला झाली होती अटक
राणा दाम्पत्याने गेल्या महिन्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खाजगी निवासस्थान असलेल्या 'मातोश्री' बाहेर हनुमान चालीसाचे पठण करण्याची घोषणा केली होती, ज्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. शिवसैनिकांच्या निदर्शनानंतर मुंबई पोलिसांनी पती-पत्नीविरुद्ध देशद्रोह आणि इतर आरोपांखाली एफआयआर नोंदवून 23 एप्रिल रोजी त्यांना अटक केली. मात्र, नंतर मुंबईतील विशेष न्यायालयाने अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आणि आमदार रवी राणा यांना 4 मे रोजी जामीन मंजूर केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Navneet Rana, Ravi rana