जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / ताईला सासरी जाण्यास सांगितले, अल्पवयीन भावाने बापाच्या डोक्यात काठी घालून घेतला जीव

ताईला सासरी जाण्यास सांगितले, अल्पवयीन भावाने बापाच्या डोक्यात काठी घालून घेतला जीव

देशपांडे यांना झालेल्या मारहाणीत ते जबर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

देशपांडे यांना झालेल्या मारहाणीत ते जबर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बऱ्याच दिवसांपासून मुलगी घरी असल्याने वडील पुंजाजी यांनी मुलीला सासरी जाण्यास सांगितले. यावरून मुलगा आणि वडील पुंजाजी यांच्यात वाद झाला.

  • -MIN READ
  • Last Updated :

भास्कर मेहरे, प्रतिनिधी यवतमाळ, 02 ॲागस्ट :यवतमाळ (yavatmal) जिल्ह्याच्या पुसद तालुक्यातील बोरी खुर्द येथे शुल्क कारणावरून एका अल्पवयीन मुलाने जन्मदात्या पित्याची (father) हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुंजाजी हर्सुजी दीपके असं मृत व्यक्तीचे नाव आहे. मुलीला परत माहेरी पाठवण्यावरून घरात वाद झाला होता. या वादातून मुलाने वडिलांची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. बोरी खुर्द येथील पुंजाजी हर्सुजी दीपके यांच्या मुलीचा विवाह काही वर्षांपूर्वी झाला होता. सासरी गेल्यानंतर काही दिवस मुलीचा संसार सुखाने चालला पण नंतर घरगुती वाद वाढले. सासरच्या लोकांशी वारंवार वाद होत असल्याने ती माहेरी वडिलांकडे राहण्यासाठी आली होती. मात्र आता बऱ्याच दिवसांपासून मुलगी घरी असल्याने वडील पुंजाजी यांनी मुलीला सासरी जाण्यास सांगितले. यावरून मुलगा आणि वडील पुंजाजी यांच्यात वाद झाला. दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. मुलाने रागाच्याभरात वडिलांवर लाकडी काठीने डोक्यावर व अंगावर वार केले. यात वडील पुंजाजी दिपके गंभीर जखमी झाले. त्यामुळे त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान पुंजाजी दिपके यांचा मृत्यू झाला. या घटनेची तक्रार पुसद शहर पोलीस स्टेशनला दिली असता मुलाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी बालकास ताब्यात घेतले आहे. अधिक तपास पोलीस करत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात