Home /News /national /

फक्त 15 दिवसांत तब्बल 50 हजार आकडा पार; असा वाढतोय भारतात कोरोना रुग्णांचा ग्राफ

फक्त 15 दिवसांत तब्बल 50 हजार आकडा पार; असा वाढतोय भारतात कोरोना रुग्णांचा ग्राफ

भारतात एक लाख प्रकरणांमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढीचा दर 5.1 आहे.

    नवी दिल्ली, 20 मे : भारतात (india) कोरोनाव्हायरसचा (coronavirus) कहर सुरूच आहे. बुधवारी 5611 नवीन प्रकरणं आलीत, तर 24 तासांत 140 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण रुग्णांची संख्या आता 1.06 लाखांवर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, फक्त 14 दिवसात 50 हजारपेक्षा जास्त रुग्ण आढळलेत. इतर देशांच्या तुलनेत भारतातील मृत्यूदर कमी आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात कोरोनाव्हायरसचे 61149 अॅक्टिव्ह केसेस आहेत. आतापर्यंत 3303 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 42297 रुग्ण बरे झालेत. भारतात 25 हजार प्रकरणं होण्यासाठी 86 दिवस लागायचे. पुढील 11 दिवसांत प्रकरणं दुप्पट होऊन 50 हजारांवर पोहोचली. तर त्याच्या पुढील आठवड्यात कोरोनाव्हायरस रुग्णांची संख्या 75 हजार पार गेली. आता फक्त 5 दिवसांत 75 हजारांपासून एक लाखांवर प्रकरणं पोहोचली. त्यातही विशेष म्हणजे या एक लाख रुग्णांपैकी 15 हजार रुग्ण मागील 3 दिवसांत आढळून आलेत. लॉकडाऊनमध्ये सूट दिल्यानंतर वाढत आहेत प्रकरणं लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात मजुरांना त्यांच्या राज्यात जाण्याची परवानगी दिल्यानंतर देशातील कोरोना संक्रमितांचा आकडा झपाट्याने वाढला. 17 मे रोजी देशात 4987 प्रकरणं होती. त्याच्या पुढील दिवसातच कोरोनाचा ग्राफ लगेच वाढला. 18 मे रोजी देशातील नव्या कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या 5242 झाली. त्यानंतर 19 मेपर्यंत हा आकडा एक लाख पार होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. हे वाचा - मुंबईतून धक्कादायक बातमी, पोलिसांपाठोपाठ IAS-IPS अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण आकडेवारी पाहिली तर भारतात कोरोनाच्या 100 प्रकरणांपासून एक लाख प्रकरणांपर्यंत पोहोचण्यासाठी 62 दिवस लागले. एक लाख केसचा विचार करता भारतातील ग्रोथ रेट 5.1 आहे. जो जगात खालून चौथ्या स्थानावर आहे. रिकव्हरी रेटही वाढतो आहे भारतात जशी कोरोनाव्हायरसची प्रकरणं वाढत आहेत, त्याच तुलनेत रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही वाढत आहे. मे महिन्याच्या सुरुवातीच्या दिवसात जेव्हा कोरोनाची प्रकरणं वाढू लागली तेव्हा रिकव्हरी रेट 25 टक्क्यांच्या जवळपास होता. आता तो 38.7% झाला आहे. उथ्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणामध्ये रिकव्हरी रेट 58% ते 63% दरम्यान आहे. तर पंजाब आणि हरयाणामध्ये सर्वात जास्त 70% रिकव्हरी रेट आहे. हे वाचा - वेंटिलेटर काढताच कोरोना रुग्णानं गर्लफ्रेंडला घातली लग्नाची मागणी; ती म्हणाली... आरोग्य मंत्रालयाच्या मते, भारतात आता प्रति एक लाख लोकसंख्येमागे कोरोना रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाण जवळपास 0.2  आहे. तर जगभरात हे प्रमाण 4.1 आहे. संपादन - प्रिया लाड
    Published by:Priya Lad
    First published:

    पुढील बातम्या