जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / वेंटिलेटर काढताच कोरोना रुग्णानं गर्लफ्रेंडला घातली लग्नाची मागणी आणि ती म्हणाली...

वेंटिलेटर काढताच कोरोना रुग्णानं गर्लफ्रेंडला घातली लग्नाची मागणी आणि ती म्हणाली...

वेंटिलेटर काढताच कोरोना रुग्णानं गर्लफ्रेंडला घातली लग्नाची मागणी आणि ती म्हणाली...

गंभीर अवस्थेत असलेल्या कोरोना रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा होताच त्याने सर्वात आधी त्याने आपल्या गर्लफ्रेंडला व्हिडिओ कॉल केला.

  • -MIN READ
  • Last Updated :

लंडन, 20 मे : कोरोनाव्हायरसची (Coronavirus) दहशत असली, तरी या दहशतीत प्रेम संपलेलं नाही. उलट अशा भयंकर परिस्थितीतही प्रेम फुलताना दिसत आहे. अशीच एक लव्ह स्टोरी लंडनध्ये (London) बहरली आहे. ही लव्ह स्टोरी आहे कोरोनाग्रस्त व्यक्तीची. कोरोनाव्हायरसमुळे गंभीर अवस्थेत असलेला या रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा होताच त्याने सर्वात आधी त्याने आपल्या गर्लफ्रेंडला व्हिडिओ कॉल केला आणि तिला थेट लग्नासाठी प्रपोज केलं आहे. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, या कोरोना रुग्णांची प्रकृती खूप गंभीर होती. त्याला वेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. हळूहळू त्याच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली. त्याला वेंटिलेटरवरून काढण्यात आलं आणि त्यानंतर या रुग्णानं सर्वात आधी पहिला कॉल केला होता आपल्या गर्लफ्रेंडला. गर्लफ्रेंडला व्हिडिओ कॉल करून त्यानं थेट लग्नासाठी विचारणा केली. विशेष म्हणजे त्याच्या गर्लफ्रेंडनं त्याला लगेच होकार दिला आणि यामुळे फक्त त्या रुग्णालाच नव्हे तर रुग्णालयातील इतर कर्मचाऱ्यांनाही आनंद झाला. हे वाचा -  63 वर्षीय महिला कोरोनाविरुद्ध जिंकली पण दुसऱ्या आजाराने हरवलं लंडनच्या रुग्णालयात आयसीयूमध्ये भरती असेलल्या रुग्णांना टॅबलेट्स देण्यात आलेत, जेणेकरून या रुग्णांना आपल्या प्रियजनांना पाहता येईल, त्यांना व्हर्च्युअल भेटता येईल, त्यांच्याशी बोलता येईल.  मात्र असं पहिल्यांदाच झालं आहे की, जेव्हा एखादा रुग्ण वेंटिलेटरवरून उठताच आपल्या कुटुंबाला संपर्क न करता गर्लफ्रेंडला फोन लावला आणि तिला थेट लग्नासाठी प्रपोज केलं. आजारी पतीला 55 दिवसांत लिहिली 45 लव्ह लेटर्स कोरोना काळात अशा बऱ्याच लव्ह स्टोरी पाहायला मिळतील. याधी चीनच्या वृद्ध जोडप्याची प्रेमाची गोष्ट समोर आली होती. हंगझोऊ शहरातील 84 वर्षीय हुआंग गुओकी यांचे 90 वर्षांचे पती सून यांना  श्वासोच्छवासाच्या समस्या आणि स्मृतिभ्रंश आजारामुळे गेल्या वर्षभरापासून हँग्जो इथे रुग्णालयात दाखल आहेत. त्या नेहमी आपल्या पतीला भेटायला जायच्या. मात्र कोरोनामुळे लॉकडाऊन लागू केल्यानंतर त्या आपल्या पतीला भेटता येत नव्हतं.  पण जीवापाड प्रेम करणाऱ्या नवऱ्याशी रोज बोलण्यासाठी त्यांनी चिठ्ठी लिहिण्यास सुरुवात केली.  सूनदेखील पत्नीने दिलेलं पत्र रोज रुग्णालयातील पलंगावर आरामात वाचत. मग ते पत्र आपल्या हातातच ठेवत असे. हे वाचा -  4 गंभीर आजार तरी कोरोनापुढे मानली नाही हार; 84व्या वयात फक्त आठवणींनी लढा जिंकला लॉकडाऊन संपल्यानंतर जेव्हा हुआंग रूग्णालयात पोहोचल्या आणि सून यांना भेटल्या. तेव्हा सगळ्यांच्या डोळ्यांत पाणी आलं. त्यांच्या अशा खऱ्या प्रेमाला सगळ्यांनी सलाम केला. संकलन, संपादन - प्रिया लाड

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात