नवी दिल्ली, 29 नोव्हेंबर: Winter session of Parliament : संसदेचे हिवाळी (Winter session of Parliament)अधिवेशन सोमवारपासून म्हणजेच आजपासून सुरू होत आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संसदेत गोंधळाच वातावरण पाहायला मिळू शकते, असे मानले जात आहे. हिवाळी अधिवेशनापूर्वी रविवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीतही (All Party Meeting)तणावाचे वातावरण पाहायला मिळालं. आम आदमी पक्षाने (AAP) बैठकीतून वॉकआउट केला आणि बैठकीला उपस्थित न राहिल्याबद्दल विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi) टीका केली.
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शेतकऱ्यांच्या एमएसपी आणि वीज बिलावर चर्चा होऊ शकते. यासोबतच विरोधक कोविड-19 मुळे मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना भरपाईचा मुद्दाही उपस्थित करू शकतात. संसदेच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी एकजुटीने सरकारला घेरण्याचा डाव आखला आहे. पेगासस, सीमेवर चीनची आक्रमकता आणि पेट्रोल-डिझेलसह इंधनाच्या वाढत्या किंमतींवरही चर्चा होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा- Kutch च्या खाडीत दोन महाकाय जहाजांची समोरासमोर टक्कर; पाहा अपघाताचे भीषण PHOTOs
विशेष म्हणजे सरकारने यापूर्वीच हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी वादग्रस्त तीन कृषी कायदे रद्द करण्याचे विधेयकही सभागृहात मांडले जाणार असल्याचे जाहीर केलं आहे. सत्ताधारी पक्ष भाजप आणि प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसनं आपल्या खासदारांना व्हीप जारी करून अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहात उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत.
हिवाळी अधिवेशनाबाबत संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन मेघवाल यांनी म्हटले आहे की, या अधिवेशनात कोणत्याही विषयावर चर्चा करण्यास सरकार तयार आहे, मात्र चर्चा पूर्णपणे सकारात्मक असावी.
विरोधकांकडून सहकार्याची अपेक्षा
मेघवाल म्हणाले, विरोधकांच्या मुद्द्यांवर नियमानुसार चर्चा करण्यास सरकार तयार आहे. विरोधकांकडून सहकार्याची अपेक्षा आहे.
हेही वाचा- आर्यन खानप्रमाणे AMAZON च्या अधिकाऱ्यांना अटक का नाही? व्यापारी संघटनेचा सरकारला सवाल
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.