मराठी बातम्या /बातम्या /देश /

आर्यन खानप्रमाणे AMAZON च्या अधिकाऱ्यांना अटक का नाही? व्यापारी संघटनेचा सरकारला सवाल

आर्यन खानप्रमाणे AMAZON च्या अधिकाऱ्यांना अटक का नाही? व्यापारी संघटनेचा सरकारला सवाल

रग्ज प्रकरणात जर आर्यन खानला अटक होते, तर अमेझॉनच्या (Why Amazon officials not arrested like Aryan Khan in drugs case asks CAIT) अधिकाऱ्यांना अटक का होत नाही, असा सवाल व्यापाऱ्यांच्या कॅट संघटनेनं उपस्थित केला आहे.

  • Published by:  desk news

नवी दिल्ली, 28 नोव्हेंबर: ड्रग्ज प्रकरणात जर आर्यन खानला अटक होते, तर अमेझॉनच्या (Why Amazon officials not arrested like Aryan Khan in drugs case asks CAIT) अधिकाऱ्यांना अटक का होत नाही, असा सवाल व्यापाऱ्यांच्या कॅट संघटनेनं उपस्थित केला आहे. मध्यप्रदेश पोलिसांनी 720 किलो मारिज्युआना ड्रग्ज जप्त केल्यानंतर (720 kg drugs seized) अमेझॉनवर कारवाई करावी, या मागणीसाठी व्यापारी संघटना आक्रमक झाली असून मध्यप्रदेश पोलिसांनी तातडीनं पावलं उचलण्याची मागणी केली आहे.

काय आहे प्रकरण?

14 नोव्हेंबर रोजी मध्यप्रदेशातील भिंड जिल्ह्यात ड्रग्ज सापडल्याप्रकरणी एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. या ड्रग्जची डिलिव्हरी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म असणाऱ्या अमेझॉनवरून झाल्याचं तपासात दिसून आलं आहे. कायदा जर सर्वांसाठी समान असेल, तर अमेझॉनला वेगळा न्याय का दिला जात आहे, असा सवाल करत गृहमंत्री अमित शाह यांनी या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी कॅट संघटनेनं केली आहे.

अमेझॉनकडून प्रतिक्रिया नाही

अमेझॉन कंपनीकडून अद्याप याबाबत कुठलाही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. आपल्या प्लॅटफॉर्मवरील प्रतिबंधित पदार्थांची विक्री झाली असेल, तर त्याची माहिती घेण्याची भाषा अमेझॉनने केली होती. मात्र त्यानंतर प्रत्यक्षात कंपनीने कुठलाही कारवाई केल्याचं चित्र नाही.

आंध्रप्रदेशातही विक्री

मध्यप्रदेशातील ड्रग्ज विक्री प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांना काही धागेदोरे मिळाले होते. त्यातून आंध्रप्रदेशमध्येदेखील अमेझॉनच्या माध्यमातून ड्रग्जची विक्री होत असल्याचं दिसून आलं होतं. त्यानंतर पोलिसांनी आंध्रप्रदेशमध्ये कारवाई करत 48 किलो गांजा जप्त केला होता. एनडीपीएस कायद्याच्या कलम 38 नुसार गुन्हाही दाखल करण्यात आला होता. हा अत्यंत गंभीर गुन्हा असून पोलिसांना संशयितांना अटक करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. मात्र तरीही अमेझॉनच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात का टाळाटाळ करत आहेत, असा सवाल कॅटने केला आहे.

नोटीस नको, अटक करा

एनडीपीएस कायद्यानुसार अमेझॉनच्या अधिकाऱ्यांना नोटीसा पाठवण्यात आल्या. तपास यंत्रणा आता त्याच्या उत्तरांची वाट पाहत बसले आहेत. नोटीशीच्या उत्तराची वाट पाहत बसण्याऐवजी तातडीनं अटक होणं गरजेचं असल्याचं व्यापाऱ्यांनी म्हटलं आहे.

हे वाचा- Adult Doll साठी महिलेच्या संमतीविनाच वापरला चेहरा, सरकली पायाखालची जमीन

अमेझॉनच्या अनेक चुका

यापूर्वीही अमेझॉननं प्रतिबंधित पदार्थांचा पुरवठा करण्यासाठी स्वतःचा प्लॅटफॉर्म वापरू दिल्याचं समोर आलं आहे. पुलवामा हल्ल्यासाठी दहशतवाद्यांनी जी स्फोटकं तयार केली होती, त्यासाठी कच्चा मालदेखील अमेझॉनवरून पुरवण्यात आल्याचं राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या तपासातून पुढं आलं होतं. हा तर देशद्रोहाचा प्रकार असून तरीही अमेझॉनवर मेहेरबानी का दाखवली जात आहे, असा सवाल करण्यात येत आहे.

First published:

Tags: Amazon, Drugs