नवी दिल्ली, 22 नोव्हेंबर : भारतीय हवाई दलासाठी आजचा दिवस खूप खास आणि अभिमानस्पद आहे. बालाकोट एअरस्ट्राईकनंतर (Balakot Airstrike) 27 फेब्रुवारी 2019 रोजी हवाई हल्ल्यात पाकिस्तानी F-16 लढाऊ विमान पाडणारे ग्रुप कॅप्टन अभिनंदन वर्धमान (Abhinandan Varthaman) यांना आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) यांच्या हस्ते वीर चक्र (Vir Chakra) प्रदान करण्यात आले आहे. नायब सुभेदार सोमबीर (Nayab Subhedar Sombir) यांना जम्मू आणि काश्मीरमधील कारवाईदरम्यान A++ श्रेणीतील दहशतवाद्याला ठार केल्याबद्दल मरणोत्तर शौर्य चक्रने (Shoury Chakra) सन्मान करण्यात आला आहे. याशिवाय पाच दहशतवाद्यांचा खात्मा करणारे मेजर विभूती शंकर धौंडियाल (Major Vibhuti Shankar Dhondiyal) यांनाही मरणोत्तर शौर्य चक्र प्रदान करण्यात आले आहे.
कॉर्प्स ऑफ इंजिनीअर्सचे सॅपर प्रकाश जाधव यांना मरणोत्तर कीर्ती चक्र, शांतता काळातील दुसरा सर्वोच्च शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आले. जाधव यांनी जम्मू-काश्मीरमध्ये कारवाईदरम्यान दहशतवाद्यांना हुसकावून लावले होते.
Delhi: Wing Commander (now Group Captain) Abhinandan Varthaman being accorded the Vir Chakra by President Ram Nath Kovind, for shooting down a Pakistani F-16 fighter aircraft during aerial combat on February 27, 2019. pic.twitter.com/CsDC0cYqds
— ANI (@ANI) November 22, 2021
Varun Gandhi लवकरच BJP ला करणार रामराम? 'या' पक्षात प्रवेश करणार प्रवेश
लष्कर कमांडर लेफ्टनंट जनरल अनिल चौहान (निवृत्त), अभियंता-इन-चीफ लेफ्टनंट जनरल हरपाल सिंग, दक्षिण नौदल कमांडर व्हाईस अॅडमिरल अनिल चावला यांना परम विशिष्ट सेवा पदक प्रदान केले जाईल. दुसरीकडे, ईस्टर्न एअर कमांडर एअर मार्शल दिलीप पटनायक यांना अति विशिष्ट सेवा पदक प्रदान आले आहे.
सीरम इन्स्टिट्यूटकडे कोव्हिशिल्डच्या 24 कोटींहून अधिक लसी, सरकारला केलं मोठं अपील
शहीद विभूती धौंडियाल यांची पत्नी भारतीय लष्करात दाखल
जम्मू-काश्मीरमध्ये 2019 साली झालेल्या पुलवामा हल्ल्यात शहीद झालेले मेजर विभूती शंकर धौंडियाल यांच्या पत्नी नितिका कौल या 29 मे 2021 भारतीय लष्करात दाखल झाल्या आहेत. नितिका भारतीय लष्करात लेफ्टनंट झाल्या आहेत. नितिका यांनी 29 मे रोजी भारतीय लष्कराचा गणवेश परिधान करून शहीद मेजर विभूती शंकर यांना श्रद्धांजली वाहिली होती. 17 फेब्रुवारी 2019 रोजी दहशतवादी हल्ल्यात मेजर विभूती शंकर धौंडियाल शहीद झाले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.