• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • सीरम इन्स्टिट्यूटकडे कोव्हिशिल्डच्या 24 कोटींहून अधिक लसी, सरकारला केलं मोठं अपील

सीरम इन्स्टिट्यूटकडे कोव्हिशिल्डच्या 24 कोटींहून अधिक लसी, सरकारला केलं मोठं अपील

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडे (Syrum Institute appeals government to help increase storage capacity) कोव्हिशिल्ड लसीच्या 24 कोटींहून अधिक लसी तयार असून केंद्र सरकारने याबाबत मदत करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 21 नोव्हेंबर: सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडे (Syrum Institute appeals government to help increase storage capacity) कोव्हिशिल्ड लसीच्या 24 कोटींहून अधिक लसी तयार असून केंद्र सरकारने याबाबत मदत करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. सीरम इन्स्टिट्यूटकडे सध्या मोठ्या प्रमाणावर लसींची (Heavy production of vaccines) निर्मिती झाली आहे. मात्र त्याचा साठा करण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही. त्यामुळे नव्या लसींची साठवणूक करण्यात मर्यादा येत असल्याचं सीरम इन्स्टिट्यूटच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. काय आहे समस्या? सीरम इन्स्टिट्यूटच्या सरकारी व्यवहारांचे संचालक प्रकाश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार कोव्हिशिल्ड लसीचे 24,89,15,000 एवढे डोस तयार असून या स्टॉकमध्ये दररोज भर पडत चालली आहे. संस्थेच्या गोडावूनमध्ये साठा करण्याची क्षमता संपत चालली असून यामुळे उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. हा वाढीव उत्पादनाचा साठा स्टोअर करण्यासाठी संस्थेला आपली साठवण मर्यादा वाढवण्याची गरज असून सरकारनं त्यासाठी त्वरित पुढाकार घेऊन तोडगा काढावा, असं अपील केंद्रीय आरोग्य खात्याला करण्यात आल्याचं कुमार यांनी म्हटलं आहे. इतर उत्पादनांवर होतोय परिणाम सीरम इन्स्टिट्यूट कोव्हिशिल्ड लसीव्यतिरिक्त इतरही अनेक औषधांची निर्मिती करत असते. त्यांच्या साठवणुकीत यामुळे मर्यादा येत असून भविष्यातील व्यवहार आणि इतर देशांतील ऑर्डर्स यांचा वेळेत पुरवठा करण्यात अडथळे येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जगभरातील इतर अनेक आजारांवरील औषधाच्या निर्मितीत खंड पडला तर भविष्यात औषधांचा साठा कमी पडण्याची शक्यता आहे. हे वाचा - Amravati Violence: "... तर अमरावतीत 13 तारखेची घटना घडलीच नसती" हस्तक्षेप करण्याचं आवाहन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सीरम इन्स्टिट्यूटमध्ये उत्पादित होणाऱ्या लसींच्या निर्मितीची क्षमता वाढवण्यात आली आहे. मात्र त्या तुलनेत साठवण क्षमतेत वाढ करण्यात आलेली नाही. आतापर्यंत लसींची मागणी अधिक असल्यामुळे साठवणुकीचा प्रश्न भेडसावत नव्हता. मात्र आता कोव्हिशिल्ड आणि इतरही सर्व उत्पादनांच्या साठवणुकीचा प्रश्न भेडसावू लागला आहे. सरकारनं यावर त्वरित मध्यस्थी करत तोडगा काढावा, अशी विनंती सीरम इन्स्टिट्यूटकडून करण्यात आली आहे.
  Published by:desk news
  First published: