प्रयागराज, 26 सप्टेंबर : प्रयागराजमध्ये झालेल्या महंत नरेंद्रगिरींच्या मृत्यूनंतर (
Will of Mahant Narendragiri may reveal new threads of his death) त्यांचा मारेकरी कोण, असा सवाल सध्या विचारला जात आहे. या प्रश्नाचं उत्तर अद्याप मिळालेलं नाही. महंत नरेंद्रगिरींच्या मृत्यूपत्रातील काही तपशीलांवरून (
Details in will) मात्र त्यांच्या मृत्यूचे धागेदोरे समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महंतांच्या मृत्यूला आता 100 तास उलटून गेले आहेत. आतापर्यंत 3 जणांना या प्रकरणी अटकही करण्यात आली आहे. मात्र अद्याप कुठलाही ठोस पुरावा पोलिसांना मिळालेला नाही.
महंत नरेंद्रगिरींचं मृत्यूपत्र
महंत नरेंद्रगिरींच्या मृत्यूपत्रातून त्यांच्या मृत्यूविषयीचे काही धागेदोरे समोर येण्यास मदत होईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. महंतांनी एक नव्हे तर तीन मृत्यूपत्रं केली होती, अशी बातमी
‘झी न्यूज’नं दिली आहे. गेल्या 10 वर्षांत तीन वेळा मृत्यूपत्र बदलण्याची वेळ महंतांवर का आली असावी, असा सवालही उपस्थित करण्यात येत आहे. प्रत्येक वेळी महंतांनी त्यांच्या मृत्यूपत्रात आपला उत्तराधिकारी कोण असावा, याचे तपशील बदलल्याचं त्यातून दिसन येत आहे.
असे झाले बदल
त्यांनी पहिलं मृत्यूपत्र केलं होतं 7 जानेवारी 2010 या दिवशी. त्या मृत्यूपत्रात बलवीर गिरी यांचं नाव उत्तराधिकारी म्हणून देण्यात आलं होतं. त्यानंतर 29 ऑगस्ट 2011 या दिवशी त्यांनी मृत्यूपत्रात बदल केला. त्यानुसार आनंद गिरींना उत्तराधिकारी ठरवण्यात आलं. तर 2 जून 2020 मध्ये त्यांनी तिसरं मृत्यूपत्र त्यांनी केलं. त्यामध्ये पुन्हा एकदा बलवीर गिरी यांचंच नाव उत्तराधिकारी म्हणून दिलं गेलं.
हे वाचा -
विकृत! बहीण घराबाहेर पडत असल्याचा सणकी भावाला राग, कात्रीने वार करून केलं जखमी
पहिल्या मृत्यूपत्रात बलवीर गिरींना उत्तराधिकारी घोषित करण्यात आलं. मात्र त्यानंतर ते हिमालयात तपश्चर्येला गेल्यामुळे आनंद गिरींना उत्तराधिकारी करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. महंतांच्या सुसाईट नोटमध्ये बलवंत गिरींनाच उत्तराधिकारी करावं, असं लिहिल्याचं सांगितलं जात आहे. मात्र ही सुसाईड नोट इतर कुणी लिहिल्याचा पोलिसांना संशय आहे. या मृत्यूपत्रातून पोलिसांना काही नवे धागेदोरे मिळतात का, याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.