Home /News /crime /

विकृत! बहीण घराबाहेर पडत असल्याचा सणकी भावाला राग, कात्रीने वार करून केलं जखमी

विकृत! बहीण घराबाहेर पडत असल्याचा सणकी भावाला राग, कात्रीने वार करून केलं जखमी

बहीण घराबाहेर पडण्याच्या किरकोळ मुद्द्यावरून झालेल्या वादात भावाने (Brother attacked sister with scissor as he didn't like her to go out of home) बहिणीवर कात्रीने जीवघेणा हल्ला केल्याची घटना उघडकीला आली आहे

    रायपूर, 26 सप्टेंबर : बहीण घराबाहेर पडण्याच्या किरकोळ मुद्द्यावरून झालेल्या वादात भावाने (Brother attacked sister with scissor as he didn't like her to go out of home) बहिणीवर कात्रीने जीवघेणा हल्ला केल्याची घटना उघडकीला आली आहे. बहिणीने घराबाहेर पडणं मान्य नसलेल्या विकृत भावानं तिच्यावर खुनी हल्ला करत तिला गंभीर जखमी केलं. तरुणीच्या वडिलांनीच अखेर आपल्या मुलाविरोधात (Father filled police case against son) पोलिसांत तक्रार दाखल केली. किरकोळ वादाने झाली सुरुवात छत्तीसगडमधील कोरबामध्ये राहणाऱ्या कुटुंबातील भावाबहिणीचे सतत वाद होत असत. आपल्या बहिणीने सतत घराबाहेर पडणं भावाला मान्य नव्हतं. त्यावरून तो अनेकदा तिला जाब विचारत असे आणि तिच्या बाहेर पडण्यावर आक्षेप घेत असे. बहिणीला मात्र त्याने घेतलेले आक्षेप मान्य नसत आणि घराबाहेर कधी पडायचं आणि कधी नाही, हे ठरवण्याचा अधिकार फक्त आपल्यालाच असल्याचं म्हणणं होतं. मात्र बुरसट विचाराच्या भावाला बहिणीनं घरातच राहणं पसंत होतं. वादानंतर मारहाण बहीण शिवणकाम करत असतानाच भाऊ तिथे आला आणि पुन्हा त्याच  मुद्द्यावरून वाद घालू लागला. दोघेही आक्रमक झाल्याने हे भांडण विकोपाला गेलं. अखेर भावानं तिथली कात्री घेऊन बहिणीवर जीवघेणे वार केले. भावाने तिच्या चेहऱ्यावर, कानावर आणि कंबरेवरही वार केले. यात बहीण गंभीर जखमी झाली. तिला कुटुंबातील इतरांनी तातडीनं उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. हे वाचा - धक्कादायक! बायकोच्या नाकाला चावा घेत पाडला तुकडा; कारण ऐकून पोलिसही चक्रावले भावाविरोधात तक्रार बहिणीवर वार करणाऱ्या तरुणावर त्याच्याच वडिलांनी अखेर गुन्हा दाखल केला. आपला मुलगा मनोरुग्ण असल्याचं वडिलांनी पोलिसांना सांगितलं. तरुणीवर सध्या मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांनी भावाविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Attack, Chattisgarh, Crime

    पुढील बातम्या