चंदिगढ, 21 एप्रिल : देशात कोरोनाशी लढण्यासाठी डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी दिवसरात्र झटत आहेत. हे लोक जीव धोक्यात घालून जनतेची सेवा करत आहेत. स्वत:चं कुटुंब, नातेवाइक यांच्यापासून दूर राहून रुग्णांची सेवा करत आहेत. मात्र यांच्या मदतीसाठी कोणी येत नसल्याची एक घटना घडली आहे. एक डॉक्टर दाम्पत्य कोरोनाच्या रुग्णांची सेवा करत असताना त्यांच्या मुलाला सांभाळण्यासाठी, त्याच्याकडं लक्ष देण्यासाठी मात्र कोणीच पुढं आलं नाही अशी खंत पती-पत्नीने बोलून दाखवली.
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार चंदिगढमधील डॉक्टर दाम्पत्याची ही कहाणी समाजातून माणुसकी हरवत तर चालली नाही ना असा प्रश्न उपस्थित करते. डॉक्टर पती पत्नी कोरोनाग्रस्तांवर उपचार करत आहेत आणि त्यांच्या सात वर्षाच्या मुलाकडे लक्ष द्यायला कोणीच तयार नाही. डॉक्टर गितिका यांना मुलाला घरात बंद करून रुग्णालयात जावं लागतं.
डॉक्टर गितिका यांचे पती संजय जैसवाल हेसुद्धा चंदिगढ पीजीआयमध्ये आहेत. ते गेल्या 17 दिवसांपासून घरी आलेले नाहीत. तर गितिका या एका खाजगी रुग्णालयात उपचार कऱण्यासाठी जातात. त्यांच्या मुलाला घरात बंद करून रुग्णालयात जातात. मुलाला काही वेळ सांभाळण्यासाठी अनेकांशी सपर्क केला पण कोणीच तयार झालं नाही अशी खंतही गितिका यांनी व्यक्त केली. त्या म्हणाल्या की,'पती पीजीआयएईआर इथं कोरोनाच्या ड्युटीवर होते. ते घरी आलेले नाहीत. अता त्यांनाही क्वारंटाइन करण्यात आलं आहे आणि पुढचे काही दिवस ते तिथंच राहतील. तपासणीनंतर रिपोर्ट निगेटिव्ह आल्यावर ते घरी येतील.
हे वाचा : कोरोनाच्या Lockdown मध्ये पोटाचा प्रश्न सोडवण्यासाठी असे एकत्र आले हजारो हात
गितिका सिंग म्हणाल्या पती अजुन काही दिवस पीजीआयमध्येच राहतील. त्यानंतर चाचणी होईल आणि ते घरी परत येतील. मी जेव्हापण एखाद्या रुग्णाच्या उपचारासाठी जाते तेव्हा मुलाला घरात लॉक करू जावं लागतं. तो सात वर्षाचा आहे. लोक फक्त तासभरसुद्धा त्याला ठेवून घ्यायला तयार नाहीत कारण त्यांना भीती वाटते.
हे वाचा : प्रेरणादायी! लॉकडाऊनमध्ये कामाचा सदुपयोग, 'हा' वल्ली तयार करतोय कोरोना लायब्ररी
संपादन - सूरज यादव
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus