Home /News /national /

प्रेरणादायी! 20 वर्षांत घरातील एकही वृत्तपत्र विकलं नाही, लॉकडाऊनमध्ये तयार करतोय ‘कोरोना लायब्ररी’

प्रेरणादायी! 20 वर्षांत घरातील एकही वृत्तपत्र विकलं नाही, लॉकडाऊनमध्ये तयार करतोय ‘कोरोना लायब्ररी’

ऐरवी वेळ नसल्याच्या तक्रारी केल्या जातात. लॉकडाऊनमध्ये मिळालेल्या वेळेत काहीतरी भन्नाट काम केलं तर भविष्यातही ही बाब प्रेरणादायी ठरू शकते

    मुजफ्फरपूर, 21 एप्रिल : कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) संसर्गामुळे देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. बराच काळ घरात राहावं लागत असल्यामुळे लोकांमध्ये अस्वस्थता आहे. मात्र यामध्ये असेही काहीजणं आहेत जे या वेळेचा सदुपयोग करीत आहेत... या दिवसात असं काहीतरी करीत आहेत की केलेल्या कामाचं भविष्यात मोठं कौतुक होईल. अशीच इच्छाशक्ती असलेला एक व्यक्ती बिहारमधील मुजफ्फरपुरमध्ये राहतो. त्यांचं नाव आहे मुक्तेश्वर प्रसाद सिंह. जिल्ह्यातील मुसहरी प्रखंडातील नवादा मानशाही निवासी मुक्तेश्वर प्रसाद सिंह यापूर्वी मुखिया आणि जिल्हा नगरसेवक होते. ते सध्या कोरोना लायब्ररी बनविण्याचा प्रयत्न करीत आहेत. समाजसेवेसाठी केलं नाही लग्न मुक्तेश्वर यांना दोन भाऊ आहेत. त्यांनी लग्न न करता आपलं संपूर्ण आयुष्य समावसेवेसाठी व्यतित केलं. त्यांना पुस्तक वाचन आणि वृत्तपत्र वाचनाची आवड आहे. त्यांच्याकडे गेल्या 20 वर्षांपासूनची वृत्तपत्र उपलब्ध आहेत. मुक्तेश्वर सिंह यांच्याकडे 1 हजार पुस्तकांची खजिना आहे. कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात ते आपल्या लायब्ररीसाठी काहीतरी चांगल करू इच्छित आहेत. ते सध्या या दिवसात वृत्तपत्रात आलेले लेख, महापुरुषांबाबतच्या बातम्या आणि कोरोनासंबंधित सर्व लेख-बातम्यांची लायब्ररी तयार करीत आहेत. यामध्ये त्यांनी वृत्तपत्रातील एक-एक बातमी वाचून त्यांतील महत्त्वपूर्ण बातम्या व लेखांची कात्रण काढून त्याची स्वतंत्र फाईल तयार केली आहे. मुक्तेश्वर सिंह यांचा लॉकडाऊनचा काळ असाचा चांगला काम करण्यात जात आहे. त्यांनी वृत्तपत्रातून आतापर्यंत 3000 कात्रण काढली असून ही डायरीच्या पानावर चिकटवली आहे. याशिवाय त्यांनी कोरोनाच्या बातम्यांची एक स्वतंत्र फाईल तयार केली आहे. यामध्ये आतापर्यंत आलेल्या कोरोनाच्या महत्त्वपूर्ण बातम्या एकत्र करण्यात आल्या आहेत. 20 वर्षांत एकही वृत्तपत्र विकलं नाही वृत्तपत्रात विविध घटनांबाबत महत्त्वपूर्ण लेख येतात. मात्र एकदा वाचून त्यांचं मन भरत नाही. त्यामुळे गेल्या 20 वर्षांत त्यांनी वृत्तपत्र रद्दीत विकली नाहीत. अशा लेखांना एकत्रित करीत त्याचं पुस्तक करण्याची त्यांची इच्छा असल्याने या लॉकडाऊनच्या काळात त्यासाठी त्यांना वेळ मिळाला आहे. गावातील तरुणांकडून केली जातेय मदत मुक्तेश्वर सिंह यांना त्यांच्या भागातील तरुणवर्ग मदत करीत आहे. अनेकांची महाविद्यालये बंद आहेत. अशा वेळात मुक्तेश्वर सिंह यांच्यासोबत राहून चांगल काम करत असल्याची भावना तरुणांनी व्यक्त केली आहे. संबंधित -कोरोना: तहसिलदारांनी Video Callने घेतले आजोबांचे अंत्यदर्शन आणी लागले पुन्हा काम
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या