जाहिरात
मराठी बातम्या / देश / पत्नीच्या अनैतिक संबंधात पतीचा अडथळा, मृतदेह पाहून पोलिसांचंही धाडस झालं नाही

पत्नीच्या अनैतिक संबंधात पतीचा अडथळा, मृतदेह पाहून पोलिसांचंही धाडस झालं नाही

पत्नीच्या अनैतिक संबंधात पतीचा अडथळा, मृतदेह पाहून पोलिसांचंही धाडस झालं नाही

पोलिसांनी मृत मिथिलेशची पत्नी रुपा आणि त्याचा प्रियकर शुभम यांना अटक करून तुरुंगात पाठवले आहे.

  • -MIN READ Local18 Uttar Pradesh
  • Last Updated :

संदीप मिश्रा (सीतापूर), 10 मे : उत्तर प्रदेशमध्ये मागच्या काही काळापासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. देशभरात गुन्हेगारीच्या बाबतीत उत्तर प्रदेश हे राज्य पुढे जात असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान गुन्हेगारीच्या घटनामुळे युपीतील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्व ऐरणीवर आला आहे. दरम्यान युपीत एका हत्याकांडाची मोठी चर्चा रंगली आहे. याबाबत पोलिसांनी या हत्याकांडाचे गुढ उकलले आहे.

जाहिरात

यूपीच्या सीतापूरमध्ये पोलिसांनी हत्येचे गूढ उकलले आहे. मिथीलेश नावाच्या व्यक्तीची हत्या झाली होती यामध्ये  पोलिसांनी मृत मिथिलेशची पत्नी रुपा आणि त्याचा प्रियकर शुभम यांना अटक करून तुरुंगात पाठवले आहे. या हत्याकांडाचे सूत्रधार मृत मिथिलेशची पत्नी रूपा असल्याचे सिद्ध झाले आहे. तिने प्रियकर शुभमच्या माध्यमातून खून केल्याचा खुलासा झाला आहे. हत्येपूर्वी रूपाने पती मिथिलेशचे लोकेशन घेऊन शुभमकरवी खून केल्याची माहिती समोर आली आहे.

रात्री झोपायला खोलीत गेलं नवविवाहित दाम्पत्य, सकाळी पाहिलं तर खळबळच उडाली

मिळालेल्या माहितीनुसार, 22 एप्रिलच्या रात्री NH 24 वर खून झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. दरम्यान पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी कारचा पाठलाग केला परंतु कारस्वार भरधाव वेगाने कार घेऊन पळून गेला. दरम्यान, महामार्गावरच समोरून शहर पोलrस ठाण्याची जीप येत असल्याचे पाहून चालकाने गाडी सोडून पळ काढला. कारमधून रक्ताने माखलेला चाकू जप्त करण्यात आला.

जाहिरात

दरम्यान घटनेच्या 1 दिवसानंतर, मिथिलेशच्या कुटुंबीयांनी रामकोट पोलिस स्टेशनमध्ये बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. पोलीस या संपूर्ण प्रकरणाच्या तळापर्यंत जाण्याआधीच खैराबाद पोलीस स्टेशन हद्दीतील रहिमाबाद येथे रस्त्याच्या कडेला या तरुणाचा मृतदेह आढळून आला. ज्याच्या कमरेचा वरचा भाग जवळपास बेपत्ता होता. महामार्गावर सापडलेल्या कारशी आणि या मृतदेहाची तपासणी केली असता याबाबत पुरावा सापडल्याने पोलिसांनी तपासाची सुत्रे याबाजूने फिरवली.

जाहिरात
प्रेमाचा भयानक अंत, त्याच्यासाठी कुटुंबाला सोडून राहिली, अखेर तिच्याच मृत्यूची बातमी आली

दरम्यान पोलिसांना पहिल्या क्षणापासून मृत मिथिलेशच्या पत्नीवर संशय होता. यानंतर कसून चौकशी केल्यानंतर पत्नीनेच खून केल्याचे रहस्य उघड झाले. पोलिसांनी मृत मिथिलेशची पत्नी रुपा आणि त्याचा प्रियकर शुभम हिला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. त्यानंतर मिथिलेशच्या हत्येचे रहस्य उलगडले. पोलिसांनी कायदेशीर कारवाई करताना मृत मिथिलेशची पत्नी रूपा आणि तिचा प्रियकर शुभम यांना तुरुंगात टाकण्यात आले आहे.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात