जाहिरात
मराठी बातम्या / देश / नवऱ्याचा खून करून मृतदेहासोबत झोपली पत्नी, सकाळी म्हणाली, या कारणामुळेच घेतला हा निर्णय..

नवऱ्याचा खून करून मृतदेहासोबत झोपली पत्नी, सकाळी म्हणाली, या कारणामुळेच घेतला हा निर्णय..

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

पत्नीने पतीसोबत धक्कादायक कृत्य केले. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

  • -MIN READ Jhansi,Jhansi,Uttar Pradesh
  • Last Updated :

झाशी , 20 फेब्रुवारी : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात घडत आहेत. अनैतिक संबंध, तसेच कौटुंबिक वादातून हत्या आणि आत्महत्येच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. यातच आता आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यूपीच्या झाशी जिल्ह्यातून एका खुनाची खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका महिलेने आपल्या पतीची हत्या करून ती रात्रभर मृतदेहासोबत झोपली. सकाळी लोकांना कळले तेव्हा सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. मात्र, महिलेचे म्हणणे आहे की, तिच्या पतीला तिच्या मुलीवर बलात्कार करायचा होता. तिने विरोध केला असता त्याने तिला मारहाण केली. यादरम्यान तिने बचावासाठी हल्ला केला, ज्यात त्याचा मृत्यू झाला. ही घटना मौरानीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील आहे. येथे राहणारा मनोहर (नाव बदलले आहे) मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे. त्याला दारूचे व्यसन होते, असे त्याच्या पत्नीचे म्हणणे आहे. दारूच्या नशेत तो अनेकदा तिच्याशी आणि मुलांशी भांडायचा. त्यामुळे सगळेच चिंतेत होते. मुलीवर लाठ्या-काठ्यांनी केला हल्ला - महिलेचा आरोप आहे की, काल रात्री तो मद्यधुंद अवस्थेत घरी आला आणि तिला शिवीगाळ करू लागला. एवढेच नाही तर त्याने मुलीचे कपडे फाडण्यास सुरुवात केली. विरोध केल्याने त्याने मुलगी व तिच्यावर काठीने हल्ला केला. बचाव करत असताना त्याच्याकडील काठी हिसकावून त्याच्यावर हल्ला केला. हेच त्यांच्या मृत्यूचे कारण ठरले. यानंतर ती महिला रात्रभर त्याच्या मृतदेहासोबत पडून होती. हेही वाचा -  लग्नाला जाण्यापासून रोखल्यावर पत्नीने दिला जीव, पतीनेही उचलले भयानक पाऊल आई-मुलीवर गुन्हा दाखल - सकाळी घटनेची माहिती मृताच्या आईला आणि परिसरातील लोकांना कळताच पोलिसांना माहिती देण्यात आली. पुरावे गोळा करण्यासोबतच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. सून आणि नातीने आपल्या मुलाची हत्या केली, असा मृताच्या आईने पोलिसांना दिलेल्या अर्जात म्हटले आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून आई-मुलगी दोघांना अटक केली आहे. आरोपी पत्नीने काय म्हटले - आरोपी महिलेचे म्हणणे आहे की, “पतीची हत्या मीच केली आहे. पती रोज दारूसाठी पैसे मागत असे. न दिल्याने तो तिला मारहाण करायचा आणि आणि मुलीवर बलात्कार करीन असे म्हणायचा. त्याने काल रात्री बलात्काराचा प्रयत्न केला. मात्र, त्यावर मी माझ्या बचावासाठी हल्ला केला, यावेळी त्याचा मृत्यू झाला. एसपी ग्रामीण झाशी नायपाल सिंह यांनी सांगितले की, दारू प्यायल्याने पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत होते. काल रात्रीही याच कारणावरून वाद झाला, त्यात आई-मुलीने बचावासाठी लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण करत त्याची हत्या केली. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात