सीकर, 25 मे: बायकोच्या (Wife) आणि तिच्या भावोजीच्या (brother in law) त्रासाला कंटाळून एका युवकानं आत्महत्या (Husband suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मृत युवकाची पत्नी आणि तिच्या भावोजीविरोधात गुन्हा दाखल केला असून दोघांनाही अटक केली आहे. आरोपी पत्नीनं एका लग्नात तिच्या भावोजीसोबत एकत्र फोटो काढला होता. पत्नीचं असं वागणं सहन न झाल्यानं पीडित तरुणानं टोकाचं पाऊल उचललं आहे. त्यानं घराजवळील एका मंदिराच्या पाठिमागे असणाऱ्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. संबंधित आत्महत्या केलेल्या युवकाचं नाव दिनेश असून तो राजस्थानातील सीकर जिल्ह्यातील रहिवासी आहे. काही दिवसांपूर्वी मृत दिनेशच्या पत्नीनं एका लग्नात तिच्या भावोजीच्या मांडीवर बसून फोटो काढला होता. यामुळे मृत दिनेशला आपल्या पत्नीचा राग आला होता. या घटनेनंतर दिनेश आणि त्याच्या पत्नीत वारंवार खटके उडू लागले होते. हे वाचा- पत्नीची हत्या करुन रचला अपघाताचा बनाव, पतीसह 6 जणांविरोधात गुन्हा दाखल यामुळे मृत दिनेशच्या पत्नीनं आपल्या भावोजीच्या मदतीनं नवऱ्यावर खोटा गुन्हा दाखल करून बदनाम करण्याचा प्रयत्न देखील केला. आरोपी पत्नी आणि भावोजी कृष्णा जाट याने दिनेशच्या सावत्र मुलीच्या मदतीनं पोलीस ठाण्यात खोटा गुन्हा दाखल केला. पत्नीच्या आणि तिच्या भावोजीच्या सततच्या त्रासाला कंटाळून दिनेशनं टोकाचं पाऊल उचललं आहे. त्यानं घराजवळील बालाजी मंदिराच्या पाठिमागे गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. हे वाचा- प्रेयसीच्या वडिलांनी तलवारीचा धाक दाखवत दिली धमकी, तरुणाची आत्महत्या याप्रकरणी फतेहपूर शेखावाटी पोलीस ठाण्यात मृताची पत्नी आणि तिच्या भावोजी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीसांनी आत्महत्येस प्रवृत केल्याच्या आरोपीखाली दोन्ही आरोपींना अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास फतेहपुर शेखावाटी पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.