मुंबई, 08 फेब्रुवारी : भांडणं, वाद असो किंवा शारीरिक, लैंगिक आकर्षक... काही लोक आपल्या पार्टनरशिवाय दुसऱ्या कुणासोबत तरी संबंध ठेवतात. कुणाचा बॉयफ्रेंड तर कुणाचा नवरा त्यांच्यासोबत विश्वासघात करत असतो (Partners cheating in relationship). पण आता यावरही संशोधकांना मार्ग सापडला आहे. संशोधक असं औषध तयार करणार आहेत, ज्यामुळे पुरुष आपल्या पार्टनरसोबत चीटिंग करूच शकणार नाही (Scientists plan to make pill to control cheating men).
पुरुष आपल्या जोडीदाराशिवाय इतर कुणासोबत संबंध का ठेवतात आणि ते दुसऱ्या कुणासोबत संबंध ठेवणार यासाठी काय करता येईल याबाबात संशोधकांनी अभ्यास केला. द सनच्या रिपोर्टनुसार एन्डोक्राइन सोसाइटीच्या ( Endocrine Society) क्लिनिकल एन्डोक्रिनोलॉजी आणि मेटाबॉलिज्म जर्नलमध्ये (Journal of Clinical Endocrinology & Metabolism) नुकतंच एक संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे.
संशोधनानुसार ज्या पुरुषांना हाइपरसेक्शुअल डिसऑर्डर (hypersexual disorder) असतं त्याच्या शरीरात ऑक्सिटॉसिन हॉर्मोनचं (oxytocin hormone) प्रमाण जास्त असतं. ऑक्सिटॉसिनला लव्ह हार्मोनही (Love Hormone) म्हटलं जातं. पुरुष आणि महिला दोघांमध्येही हे हार्मोन असतं, जे सकारात्मक भावना निर्माण करण्यात मदत करतं.
हे वाचा - मोठ्या उत्साहाने सरप्राईज द्यायला गेली; बॉयफ्रेंडला त्या अवस्थेत बघताच हादरली
संशोधकांनी हायपर सेक्शुअल डिसऑर्डर असलेल्या 64 पुरुष आणि लैंगिक भावना निर्माण करणाऱ्या हार्मोनची पातळी सामान्य असलेल्या 38 पुरुषांचा अभ्यास केला. ज्या पुरुषांमध्ये ऑक्सिटॉसिनचं प्रमाण जास्त आहे, ते लोक इतर व्यक्तीसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी आपल्या पार्टनरला धोका देतात, असं या संशोधनात दिसून आलं.
ऑक्सिटॉसिन आणि सेक्शुअल हायपरटेन्श यांचा थेट संबंध आहे, असं संशोधक म्हणाले. त्यामुळे ऑक्सिटॉसिन कमी करणारं औषध या यावर उत्तम उपाय आहे, अशी आशा संशोधकांनी व्यक्त केली आहे. असं औषध बनवता येऊ शकतो, ज्यामुळे शरीरातील ऑक्सिटॉसिनची मात्रा कमी होईल आणि पुरुष महिलांना धोका देणार नाहीत, असा दावा संशोधकांनी केला आहे.
हे वाचा - Valentine's Week: पार्टनरला खूश करण्यासाठी देऊ शकता ही 5 स्पेशल गिफ्ट्स
औषधांशिवायही हे शक्य आहे, असंही या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आहे. जे पुरुष कॉग्निटिव बिहेविअर थेरेपी घेतात त्यांच्यातील ऑक्सिटॉसिनची पातळी आणि हाइपरसेक्शुअल डिसऑर्डर कमी झालं. त्यामुळे औषधांशिवायही ऑक्सिॉसिनची पातळी कमी झाल्याचं संशोधक म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Couple, Health, Lifestyle, Medicine, Relationship