नवी दिल्ली, 24 डिसेंबर : गेल्या काही दिवसांमध्ये अचानक मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. सहज बसलेलं असताना, स्टेजवर अभिनय करत असताना, व्यायाम करत असताना, लग्नात डान्स करत असताना, मैदानात खेळत असताना अचानक अनेकांचे मृत्यू झाले आहेत. अशा घटनांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलदेखील झाले आहेत. या मृत्यूंमागे कार्डिअॅक अरेस्ट कारणीभूत असल्याचं म्हटलं जातं आहे. कार्डिअॅक अरेस्टच्या घटनांमध्ये अचानक वाढ का झाली आहे, त्याचा कोरोनाशी काही संबंध आहे का, असे अनेक प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाले आहेत. त्याबाबत विविध प्रकारच्या अफवाही पसरवल्या जात आहेत. त्यामुळे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी अभ्यास सुरू केला आहे. ‘नवभारत टाइम्स’ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. अलीकडच्या काळात सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यामध्ये दैनंदिन गोष्टी करत असताना अचानक कोणाचा तरी मृत्यू झाल्याचं दिसलं आहे. विशेष म्हणजे अशांपैकी अनेक जण तरुण आहेत. एका कार्डिऑलॉजिस्टने सांगितलं, की ‘लोकांनी हृदयविकारांच्या विविधलक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. वय, फिटनेस काहीही असलं, तरी प्रत्येकाने वेळोवेळी आरोग्य तपासणी केली पाहिजे.’ स्टेजवर कोसळला अन् काही सेकंदातच गेला कलाकाराचा जीव; मृत्यूचा हृदय पिळवटून टाकणारा Live Video हार्ट अॅटॅक आणि कार्डिअॅक अरेस्ट यात फरक आहे. हृदयाला जाणारा रक्तपुरवठा खंडित झाल्यास हार्ट अॅटॅक येतो. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या मते, हार्ट अॅटॅक ही एक ‘अभिसरण’ समस्या आहे, तर कार्डिअॅक अरेस्ट ही ‘इलेक्ट्रिकल’ समस्या आहे. कार्डिअॅक अरेस्ट हा हार्ट अॅटॅकपेक्षा जास्त अधिक घातक आहे. कारण, यामध्ये हृदयाचे ठोके अचानक थांबतात किंवा मोठ्या प्रमाणात अनियमित होतात. व्हर्बल अॅटॉप्सी पद्धतीचा होणार अवलंब कार्डिअॅक अरेस्टच्या घटनांमध्ये अचानक वाढ होण्याचं कारण शोधण्यासाठी आणि त्यात कोरोनाची काही भूमिका आहे का हे शोधण्यासाठी आयसीएमआरने अभ्यास सुरू केला आहे. देशभरातल्या आकस्मिक मृत्यूच्या प्रकरणांचा तज्ज्ञांनी तपास सुरू केला आहे. त्यासाठी व्हर्बल अॅटॉप्सी पद्धतीचा अवलंब केला जात आहे. यामध्ये कार्डिअॅक अरेस्टनं मृत्यू झालेल्या व्यक्तीमध्ये कोणती लक्षणं दिसली, त्याचा मृत्यू कोणत्या परिस्थितीत झाला, याआधी त्याला काही समस्या होत्या का इत्यादी माहिती संकलित केली जाणार आहे. बापरे..! जखमी रुग्णाला हॉस्पिटलमध्ये नेण्याऐवजी अॅम्ब्युलन्स चालकाने पाजली दारू टॉप कार्डिऑलॉजिस्ट आणि फॉरेन्सिक एक्स्पर्ट्सची मदत टाइम्स ऑफ इंडियानं सूत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या वृत्तानुसार, आयसीएमआरने या अभ्यासात काही आघाडीचे कार्डिऑलॉजिस्ट आणि एम्समधल्या फॉरेन्सिक एक्स्पर्ट्सची मदत घेतली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, ‘आकस्मिक मृत्यूंमागचं संभाव्य कारण काय आहे याबद्दल खोटी माहिती पसरवली जात आहे. अनेक जण याचा संबंध कोरोना आणि त्याच्या लसीशीही जोडत आहेत. अशा घटनांमागचं खरं कारण शोधणं, हा या अभ्यासाचा उद्देश आहे.’ पत्नीसोबत अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवणं महागात पडलं, मुंबईतील पतीची तुरुंगात रवानगी तरुणांचे मृत्यू होत असल्यानं चिंता तज्ज्ञांनी आता आकस्मिक मृत्यू झाल्यास पोस्टमॉर्टेम करण्याचीही सूचना केली आहे. एखाद्या तरुणाचा आकस्मिक मृत्यू झाला असेल आणि त्याला हृदयविकार नसेल तरीही त्याचं पोस्टमॉर्टेम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. एका तज्ज्ञाने सांगितलं, की ‘यामुळे मृत्यूचं खरं कारण शोधण्यात मदत होईल. पोस्टमॉर्टेममध्ये मृत्यूचं कारण हृदयाशी संबंधित आजार असेल आणि मृत व्यक्तीला याची कल्पना नसेल, तर त्याच्या कुटुंबीयांना माहिती दिली जाईल. त्यांच्या कुटुंबात कोणाला हृदयाशी संबंधित आजार आहेत का, याचीही चौकशी करता येईल. हृदयाशी संबंधित काही आजार असे असतात की, ते एका पिढीकडून दुसऱ्याकडे जाऊ शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.