जाहिरात
मराठी बातम्या / देश / कहर! मुलाला केळीच्या पानावर गंगेत सोडलं, कारण वाचून हैराण व्हाल

कहर! मुलाला केळीच्या पानावर गंगेत सोडलं, कारण वाचून हैराण व्हाल

सर्पदंशाने मृत पावलेली व्यक्ती पुन्हा जिवंत होते?

सर्पदंशाने मृत पावलेली व्यक्ती पुन्हा जिवंत होते?

गौरव सिंह, प्रतिनिधी भोजपूर, 8 जुलै : आपल्या भारतात सापांच्या 13 विषारी प्रजाती आढळतात. त्यापैकी एक साप व्यक्ती झोपेत असताना डास चावल्यासारखा डसतो. त्यानंतर काही कळण्याच्या आत शरीरभर विष पसरून व्यक्तीचा झोपेतच मृत्यू होतो. याबाबत आपल्यापैकी बऱ्याचजणांनी ऐकलं असेल. मात्र सर्पदंशाने मृत्यू झालेली व्यक्ती पुन्हा जिवंत होते, असं कधी ऐकलंय का? याच अंधश्रद्धेतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बिहारच्या आरा भागात असलेल्या महुली घाटावर एका 8 वर्षीय बालकाला केळीच्या पानांची होडी बनवून त्यावर बांधून गंगेच्या पाण्यात सोडण्यात आलं.

  • -MIN READ Local18 Bhojpur,Bihar
  • Last Updated :

गौरव सिंह, प्रतिनिधी भोजपूर, 8 जुलै : आपल्या भारतात सापांच्या 13 विषारी प्रजाती आढळतात. त्यापैकी एक साप व्यक्ती झोपेत असताना डास चावल्यासारखा डसतो. त्यानंतर काही कळण्याच्या आत शरीरभर विष पसरून व्यक्तीचा झोपेतच मृत्यू होतो. याबाबत आपल्यापैकी बऱ्याचजणांनी ऐकलं असेल. मात्र सर्पदंशाने मृत्यू झालेली व्यक्ती पुन्हा जिवंत होते, असं कधी ऐकलंय का? याच अंधश्रद्धेतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बिहारच्या आरा भागात असलेल्या महुली घाटावर एका 8 वर्षीय बालकाला केळीच्या पानांची होडी बनवून त्यावर बांधून गंगेच्या पाण्यात सोडण्यात आलं. यामागचं कारण अतिशय भीषण आहे. चामुखा गावात राहणाऱ्या या मुलाचं नाव आदर्श कुमार असं होतं. त्याला रात्री झोपेत साप चावला. त्यानंतर तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. विष त्याच्या संपूर्ण शरीरात भिनलं होतं. परिणामी, सदर रुग्णालयात उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर तो पुन्हा जिवंत होईल या भाबड्या आशेने त्याच्या कुटुंबीयांनी त्याच्यावर अंत्यसंस्कार केले नाहीत, तर त्याचा मृतदेह गंगेच्या मधोमध नेऊन लाटांमध्ये सोडून दिला. https://www.youtube.com/embed/cOMEe2T_LYo गंगेत केळीच्या पानांवर आदर्शचा मृतदेह वाहत होता. हे दृश्य पाहून गंगेतील नाविकही हादरले. काही नाविकांनी त्याचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर पोस्ट केला. या व्हिडिओत आपण स्पष्टपणे पाहू शकता की मृतदेह केळीच्या पानांवर बांधण्यात आला आहे. झोपेत डसतात, रक्ताच्या गुठळ्या करतात; भारतात आढळतात हे 13 विषारी साप दरम्यान, याबाबत शास्त्र अभ्यासक विष्णू देव उपाध्याय यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्पदंशाने मृत पावलेल्या व्यक्तीचा पुनर्जन्म होतो, अशी मान्यता आहे. त्यासाठीच त्याचा मृतदेह गंगेत प्रवाहीत केला जातो. कोणतातरी चमत्कार होईल आणि शरीरातून विष बाहेर निघून ती व्यक्ती पुन्हा जिवंत होईल, अशी यामागे श्रद्धा असते. आपण याला अंधश्रद्धा म्हणू शकता किंवा चमत्कारही म्हणू शकता, परंतु 20 वर्षांपूर्वी हा प्रकार सर्रास पाहायला मिळायचा, असं त्यांनी सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात