Home /News /national /

अमेरिकेच्या सांगण्यावरुन भारताने चेन्नईमधील ते हेलिकॉप्टर का जप्त केलं? वाचा काय आहे हा करार

अमेरिकेच्या सांगण्यावरुन भारताने चेन्नईमधील ते हेलिकॉप्टर का जप्त केलं? वाचा काय आहे हा करार

शुक्रवारी ईडीनं अमेरिकेच्या (America) विनंतीवरून मनी लाँड्रिंग प्रकरणाशी (Money Laundering) संबधित मोठी कारवाई करत चेन्नईतून (Chennai)एक हेलिकॉप्टर (Helicopter) जप्त केलं आहे

नवी दिल्ली 30 ऑक्टोबर : जगभरातील विविध देश परस्परांशी सहकार्य आणि सौहार्दाचे संबंध प्रस्थापित करून पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतात. व्यापार, सुरक्षा, विज्ञान अशा विविध क्षेत्रात दोन देश एकमेकांना सहकार्य करून त्या त्या क्षेत्रातील आपली उणीव दूर करून त्यात प्रगती करतात. यासाठी दोन देशांमध्ये विविध प्रकारचे करार (Treaty) केले जातात. या क्षेत्रांसह अंमली पदार्थ, शस्त्रास्त्रे, मानवी तस्करी, मनी लाँड्रिंग अशा अनेक प्रकारची आंतरराष्ट्रीय पातळीवरील गुन्हेगारी रोखण्यासाठी गुन्हेगारांचे प्रत्यर्पण करण्याबाबत तसंच अन्य सहकार्याबाबतही करार केले जातात. या करारामुळे सर्व देशांना आपल्या देशात गुन्हे करून दुसऱ्या देशात पळून जाणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई करणं शक्य होतं. तसंच अशा गुन्ह्यांचा तपास करणंही शक्य होतं. आपल्या देशातील अनेक बँकांची कर्जं बुडवून परदेशात पळून गेलेल्या विजय मल्ल्या, नीरव मोदी अशा गुन्हेगारांना भारतात परत आणण्यासाठी असे करार उपयुक्त ठरत असल्याचे दिसत आहे. हे लोक ज्या देशांमध्ये आहेत, त्या देशांशी आपले याबाबतीतील सहकार्य करार असल्यानं त्यांच्यावर तिथंही कायदेशीर कारवाई केली जात आहे. नुकत्याच अशाच एका प्रकारणात आपण अमेरिकेला सहकार्य केलं आहे. आजतकने याबाबतचं वृत्त दिलं आहे. चीनच्या बॉर्डर डिफेन्स व्हिलेजला भारताचं मॉडेल व्हिलेज देणार प्रत्त्युत्तर शुक्रवारी सक्तवसुली अंमलबजावणी संचालनालयाने अर्थात ईडीनं (ED) अमेरिकेच्या (America) विनंतीवरून मनी लाँड्रिंग प्रकरणाशी (Money Laundering) संबधित मोठी कारवाई करत चेन्नईतून (Chennai)एक हेलिकॉप्टर (Helicopter) जप्त केलं आहे. थायलंडमधील (Thailand) बँकॉकस्थित (Bangkok) कंपनीच्या मालकीचं हे हेलिकॉप्टर असून, अमेरिकेला मदत करण्यासाठी न्यायालयाच्या आदेशावरून ईडीने ही कारवाई केली आहे. अमेरिका आणि भारत यांच्यात असलेल्या म्युच्युअल लीगल असिस्टन्स ट्रीटीअंतर्गत (Mutual Legal Assistance Treaty) भारतानं ही अंमलबजावणी केली आहे. याबाबत ईडीनं दिलेल्या माहितीनुसार, बँकॉकमधील हमीद इब्राहिम आणि अब्दुल्ला यांच्या नावावर असलेलं हे 'बेल 214' (BELL 214) हेलिकॉप्टर अमेरिकेतील एएआर कार्पोरेशन कंपनीकडून आयात करण्यात आलं होतं. थायलंडमधून हे हेलिकॉप्टर भारतात आणून चेन्नईतील जे मातादी (J Matadi) फ्री ट्रेड वेअरहाऊस झोनमध्ये (FTWZ) लपवण्यात आलं होतं. या हेलिकॉप्टरचा वापर आरोपींनी प्रतिबंधीत देशात केला असल्याचा आरोप यूएस डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटीने (US Department of Homeland Security) केला आहे. या आरोपींनी भारतात हे हेलिकॉप्टर लपवलं असल्यानं भारतानं त्यावर कारवाई करावी अशी विनंती अमेरिकेनं केली होती. COVAXIN घेतलेल्यांना COVISHIELD घेण्याची परवानगी द्यावी, न्यायालयात याचिका त्यानुसार, ईडीने प्रीव्हेंशन ऑफ मनी लाँड्रिंग अॅक्ट (PMLA) च्या कलम 17(1A) अंतर्गत हे हेलिकॉप्टर जप्त केलं आहे. ईडीने चेन्नई एफटीडब्ल्यूझेड आणि मेरीलॉग एव्हियन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालकांच्या निवासस्थानांसह विविध परिसरांची झडती घेतली होती. हे हेलिकॉप्टर ताब्यात घेतलं तेव्हा ते विविध भाग सुटे केलेल्या अवस्थेत होतं. त्याचे वेगवेगळे भाग विखरून पडले होते. हे हेलिकॉप्टर एका गोदामात ठेवण्यात आले होते आणि त्यासाठी दरमहा भाडेही दिले जात होते अशी माहिती ईडीने आपल्या निवेदनात म्हटलं आहे.
First published:

Tags: Helicopter, India america

पुढील बातम्या