मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

Adult Doll साठी महिलेच्या संमतीविनाच वापरला चेहरा, सरकली पायाखालची जमीन

Adult Doll साठी महिलेच्या संमतीविनाच वापरला चेहरा, सरकली पायाखालची जमीन

आपल्या सहमतीविनाच अडल्ट डॉलसाठी (Face of a woman used for adult doll without her consent) आपल्या चेहऱ्याचा वापर केल्याचं समजल्यानंतर तरुणीच्या पायाखालची जमीन सरकली आहे.

  • Published by:  desk news

जेरुसलेम, 28 नोव्हेंबर: आपल्या सहमतीविनाच अडल्ट डॉलसाठी (Face of a woman used for adult doll without her consent) आपल्या चेहऱ्याचा वापर केल्याचं समजल्यानंतर तरुणीच्या पायाखालची जमीन सरकली आहे. बाहुल्यांची बाजारपेठ ही जगभरातल्या अनेक (Doll market in boom) देशांमध्ये चलतीत आहे. लहान मुलांच्या बाहुल्यांना ज्याप्रमाणं डिमांड असते, तशीच डिमांड अडल्ट बाहुल्यांनादेखील असते. अनेक तरुण अडल्ट डॉल खरेदी करत (Entertainment value of an adult doll) असतात आणि आपलं मनोरंजन करत असतात. या बाहुल्यांचा चेहरा कसा असावा, हा एक फारच नाजूक आणि संवेदनशील मुद्दा असतो. कुठल्याही व्यक्तीचा चेहरा त्या व्यक्तीच्या सहमतीशिवाय वापरणं, हा कायदेशीर गुन्हा ठरतो. इस्रायलमध्ये नुकतंच असं एक प्रकरण समोर आलं आहे.

येईलचा वापरला चेहरा

इस्रायल डिफेन्स फोर्समध्ये काम केलेली 25 वर्षांची कोहेन एरिस हिला अडल्ट डॉलसाठी स्वतःचा चेहरा वापरल्याचं जेव्हा समजलं, तेव्हा तिला जबर धक्का बसला. कोहेनचे सोशल मीडियावर लाखो चाहते असून 10 लाखांपेक्षा जास्त लोक तिला फॉलो करत आहेत. तिचा चेहरा अडल्ट डॉलसाठी वापरण्यात आला असून आपला ब्युटी मार्कदेखील हुबेहूब वापरण्यात आल्याचं तिनं म्हटलं आहे.

विक्री थांबवण्याची मागणी

या बाहुल्यांची विक्री ताबडतोब थांबवावी, अशी मागणी तिनं केली आहे. आपल्या संमतीशिवाय अशा प्रकारे आपला चेहरा वापरणं हे बेकादेशीर असून कंपनीविरोधात पावलं उचलण्याचा निर्णय़ घेतला आहे.

हे वाचा- वर्दीची शपथ घालून तरुणीवर बलात्कार; आर्मीतील पळपुट्याचा कांड वाचून बसेल धक्का

प्रसिद्धीचा गैरफायदा

अडल्ट डॉलची प्रसिद्धी करण्यासाठी आपल्या चेहऱ्याचा गैरवापर करण्यात आल्याचा दावा तिने केला आहे. आपले काही फोटो आणि व्हिडिओ यांचा वापर करून आपलं प्रॉडक्ट खपवण्याची कंपनीची योजना असली, तरी हा आपल्या अधिकारांवर अतिक्रमण करण्याचा प्रकार असून न्यायालयात जाणार असल्याचा इशारा कोहेननं दिला आहे. दिलेल्या मुदतीत या बाहुल्यांची विक्री बंद झाली नाही, तर ती कंपनीवर कारवाई सुरू करणार आहे.

First published:

Tags: Crime news, Face, Israel